Helicopter Baby Shower Surprise Viral Video : आई होणे हा महिलांच्या जीवनातील सुंदर अनुभव असतो. कुटुंबातील महिला गरोदर असेल तर संपूर्ण कुटुंबच तिचे लाड, हट्ट पुरवतात आणि तिच्यासाठी खास डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. अगदी साडीपासून ते तिला खायला आवडणारं सगळं तिला यादरम्यान दिलं जातं. तर आज असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे; ज्यामध्ये नवऱ्याने सुद्धा त्याच्या बायकोसाठी खास डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पण, या कार्यक्रमातील एका सरप्राइजने मात्र सगळ्यांना वेड लावले.
कर्नाटकातील मंगळुरू येथील अड्यार गार्डनमध्ये (Adyar Garden) हा डोहाळेजेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. एका व्यक्तीने आपल्या गर्भवती पत्नीच्या ओटभरणीसाठी केलेल्या लहानश्या कृतीने सगळ्यांचे मन जिंकले. हा कार्यक्रम उद्योजक प्रकाश यांनी आयोजित केला होता. ज्या स्टेजवर जोडपे उभे असते तिथेच अगदी वर हेलिकॉप्टर थांबून त्यातून पाकळ्यांचा वर्षाव होण्यास सुरुवात होते. डोहाळे जेवणादरम्यान दरम्यान त्याने खास आकाशातून फुलांच्या पाकळ्या बायकोवर टाकून सगळ्या पाहुणे मंडळींना थक्क केले.
पहिल्यांदाच बघायला मिळाला असा अनोखा सोहळा (Viral Video)
आई होण्याचा तिचा प्रवास हा कठीणच असतो. त्यामुळे या काळात तिला फक्त प्रेम आणि काळजी या दोनच गोष्टींची अपेक्षा असते. त्यामुळे शेतकऱ्यानेही ही गोष्ट लक्षात ठेवून गाईचे डोहाळजेवण थाटामाटात पार पडले. पण, डोहाळेजेवणाचा कार्यक्रम आणखीन लक्षात राहण्यासाठी नवऱ्याने त्यात आणखीन भर घातली. खास हेलिकॉप्टर मागवून बायको आणि पाहुण्यांवर फुलांचा वर्षाव केला;जे दिसायला एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही. एकदा बघाच व्हायरल होणारा हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ या @maamantraventures इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “आकाशात उंच भरारी घेणारं प्रेम… मंगळुरूमधील नवऱ्याने बेबी शॉवरसाठी पत्नीवर हेलिकॉप्टरमधून फुलांचा वर्षाव करून खास सरप्राईज दिले. पहिल्यांदाच असा अनोखा सोहळा बघायला मिळाला. खरंच लक्षात राहणारा क्षण” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
नेटकरी व्हिडीओ पाहून “तो ड्रोन पण वापरू शकला असता”, “जेव्हा एखादा पुरूष त्याच्या स्त्रीवर खरोखर प्रेम करतो”, “तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही काहीही साध्य करू शकता”, “हे पैसे खर्च करण्याऐवजी, तीन मुलींच्या लग्नात मदत केली असती तर बरं झालं असतं”, “लक्षात राहील असं डोहाळेजेवण”, “हौसेला मोल नसते” ; आदी अनेकविध कमेंट्स व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत..
