Viral video man throw wrapper outside : घर, रस्ता एकूणच शहर स्वच्छ ठेवण्यामध्ये सफाई कामगारांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. पहाटे लवकर उठून घरोघरी जाऊन आणि रस्त्याकडेचा कचरा उचलून परिसर स्वच्छ ठेवण्यात मोलाची जबाबदारी पार पाडतात. मग, आपण कचरा रस्त्यावर किंवा इथे तिथे न फेकता कचराकुंडीत कचरा टाकण्याचे योगदान दिले पाहिजे ना. तर आज सोशल मीडियावर हीच गोष्ट पटवून देताना एक माणूस दिसला आहे. यामध्ये कचरा रस्त्यावर फेकणाऱ्या एका माणसाला चांगलाच सुनावले आहे.

सार्वजनिक मालमत्तेस हानी पोहोचवताना दिसला तर त्याला टोकण्याची जबाबदारी कोणीही घेताना दिसत नाही. पण, दिल्लीती एक चालक केएफसीचे टेकअवे रॅपर खिडकीतून रस्त्यावर फेकताना दिसला. त्यानंतर एका प्रत्यक्षदर्शीशीने त्याला सुनावले नाही तर जोरदार भांडण सुरु केले. एवढंच नाही तर त्याने व्हिडीओ रेकॉर्ड करून त्याला कचरा साफ करण्यास सुद्धा भाग पाडले.

जवळच उभा असलेला एक व्यक्ती तत्काळ त्या चालकाला जाब विचारतो आणि त्याच्या कृतीवर प्रश्न उपस्थित करतो. हिंदी भाषेत “तुझ्या बापाचा रस्ता आहे का” असे रागात म्हणताना दिसत आहेत. चालकाकडे वारंवार कचरा उचलण्याची मागणी करूनही उचला नाही तर पोलिसांना बोलावून दंड भरायला लावेन असेही म्हणतो. मात्र, हट्टी कार चालक कचरा साफ करण्यासाठी वाहनातून अजिबात बाहेर पडत नाही. त्याचा सगळा कचरा गाडीच्या खिडकीतून रस्त्यावर टाकून झाल्यानंतर तो ऐटीत बाहेर पडतो.

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओ पाहून दिल्ली वाहतूक पोलिसांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण संबंधित वाहतूक निरीक्षकाकडे पाठवण्यात आले आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @divya_gandotra या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. एका युजरने हा व्हिडीओ रिपोस्ट करून “तुम्ही कार, बर्गर किंवा इतर काहीही खरेदी करू शकता. पण, सिव्हिक सेन्स पैसे खरेदी करून मिळवता येत नाही. ती स्वतः विकसित करावी लागते. या माणसाने रस्त्यावर कचरा फेकताना कुठलाही लाज वाटली नाही, जणू सार्वजनिक जागा त्याचा वैयक्तिक डस्टबिन आहेत. अशा लोकांचा विचारसरणीबाबत गंभीर प्रश्न आहे; इतरांचा आणि समाजाचा विचार न करणे चुकीचे आहे” ; अशी कॅप्शन लिहिली आहे, जी अगदी योग्य आहे.