funny interaction between man and cop viral video : दररोज आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडत असतात, ज्याने कधी तुमच्या चेहऱ्यावर आनंद, दुःख तर कधी आश्चर्याचे भाव निर्माण होतात. त्यामुळे असे प्रसंग आपण मोबाईल मुद्दाम रेकॉर्ड करून घेतो. पण, आजचा व्हायरल व्हिडीओ नकळत शूट करण्यात आला आहे. त्यामुळे कदाचित बघताना तुम्हाला सतत ट्विस्ट घेऊन येणाऱ्या एखाद्या सिनेमासारखा किंवा पोट धरून हसवणाऱ्या कार्टूनच्या एपिसोडसारखा वाटेल.

कोलकातामध्ये राहणारी इन्स्टाग्राम युजरने @lj.in1tx तिच्या बाल्कनीतून शूट केलेला हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांच्या परिसरातील एका अज्ञात माणसाने रात्री १ वाजल्यापासून गोंधळ घालायला सुरुवात केली, त्यामुळे कोणालाच झोप लागली नाही. सकाळी ७ वाजता तर त्याने हद्दच पार केली. रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांवर दगड फेकायला सुरुवात केली, सगळ्यात मजेशीर आणि तेवढंच धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्याचा एक दगड चुकून पोलिसांच्या गाडीला लागला. पोलिसांनी गाडी थांबवली आणि गाडीतून उतरून ठेव त्याला चोप द्यायला सुरुवात केली. मग पोलिसांनी त्याला पकडलं आणि मग गाडीत नेऊन बसवले. पण, इथे आणखीन एक ट्विस्ट आला.

एखाद्या सिनेमापेक्षा कमी नाही (Viral Video)

गाडीचा दरवाजा उघडा आहे याचा अंदाज घेऊन तो दुसऱ्या दरवाजाने धूम ठोकून पळाला. मग काय पुन्हा पोलीस त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावले. या सगळ्यात परिसरात जमलेली मंडळी सुद्धा सहकार्य करत होती आणि तो अज्ञात माणूस फक्त स्वतःची सुटका कशी होईल या विचाराने जिथे वाट दिसेल तिथे पळत होता. शेवटी डिव्हायडरवरून उडी मारून पलीकडे जाणार इतक्यात पोलीस त्याला समोर येणाऱ्या बाईक चालकाच्या मदतीने पकडतो आणि अशाप्रकारे एखाद्या सिनेमासारखा शेवट होतो.

व्हिडीओ नक्की बघा…

येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांवर दगड फेकणाऱ्या या अज्ञात माणसाचा आणि पोलीस यांच्यात घडलेले गोंधळलेले नाट्यमय प्रसंग एखाद्या ‘रिअल-लाईफ कार्टून’ प्रमाणेच समोर आला आहे. यात पाठलाग, अचानक पळून जाणे आणि हार मानायला तयार नसलेले आजूबाजूचे लोकअशा सर्व गोष्टींचा समावेश होता. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @lj.in1tx @indians या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून पोट धरून हसताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत…