Desi Jugaad to Save Cats: अगदी शाळेपासून सर्वांना शिकवलं जातं की माणसाने नेहमी प्राण्यांवर प्रेम केलं पाहिजे आणि गरजूंना नेहमी मदत केली पाहिजे. भारत आणि जुगाड हे फार जवळचं नातं आहे असं म्हणतात की आपल्या देशात टॅलेन्टची कमी नाही. कधी कोणता जुगाड कसा उपयोही ठरेल हे सांगता येत नाही. आपण कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारचे जुगाड एखाद्याचा जीव सुद्धा वाचवू शकतात. सध्या अशाच एका जुगाडाची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. या देशी जुगाडाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हा व्हिडीओ चर्चेत येण्यामागचं कारणही तितकंच खास आहे. या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने जीवन मरणाच्या दारात असलेल्या दोन मांजरींना वाचवण्यासाठी एक अप्रतिम देसी जुगाड वापरला आहे. हा व्हिडीओ पाहून IFS अधिकारीही त्या व्यक्तीचे कौतुक केल्याशिवाय राहू शकले नाहीत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा त्या व्यक्तीच्या बुद्धिमत्तेला सलाम ठोकाल. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर त्या व्यक्तीचं जोरदार कौतुक करण्यात येत आहे.

उंचीमुळे मांजरी खूप घाबरल्या
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, दोन मांजरी वर उंचावर असलेल्या एका वायरला लटकल्या होत्या. उंचावर असलेल्या या वायरवरून खाली पडणार या भीतीने यो दोन्ही मांजरी वायरला आपल्या हाता पायांनी घट्ट पकडून स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होत्या. या दोन्ही मांजरी पूर्णपणे घाबरून गेल्या होत्या. हे पाहून तिथे एक व्यक्ती येतो आणि त्यांना खाली पडण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करतो. यासाठी हा व्यक्ती एक देसी जुगाड वापरतो. त्याने ही शक्कल लढवली ते पाहून तुम्हीही या व्यक्तीचं तोडंभरून कौतुक कराल.

या व्यक्तीने एक बादली घेऊन तिला एक उंच काठी बांधून घेतली. सर्वात विशेष बाब म्हणजे दोन्ही मांजरी वायरवरून निसटून खाली पडण्याच्या आत त्याला हा देसी जुगाड पटापट तयार करून त्यांचा जीव वाचवण्याचा मोठा टास्क त्याच्या समोर होता. यात तो यशस्वी सुद्धा झाला. हा देसी जुगाड पटापट तयार करून मांजरीच्या दिशेने पकडून ठेवली. या मांजरीपण इतक्या हुशार होत्या की त्यांनी बरोबर या बादलीत पटापट उड्या घेतल्या आणि मग या व्यक्तीने काठीने ती बादली खाली आणत जमिनीवर ठेवली. त्यानंतर या दोन्ही मांजरी सुखरूप बादलीबाहेर पडल्या.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बाईकवर स्टंट करत मुलींना इम्प्रेस करायला गेला, मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : अबब ! एका बिअर कॅनमध्ये अडकला चार फूटाचा कोब्रा…

हा व्हिडीओ पाहताना सुरूवातीच्या काही मिनिटांसाठी अनेकांनी श्वास रोखून ठेवला होता, पण जसंच या दोन्ही मांजरी सुखरूप खाली उतरतात हे पाहून सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. हा व्हिडीओ IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. ‘दयाळूपणा नेहमीच शक्य आहे’ अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडलाय की, आतापर्यंत या व्हिडीओला ४७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या वेगवेगळ्या भावना करत कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video man took out a wonderful desi jugaad to save the cats who battling for life and death prp
First published on: 06-12-2021 at 15:44 IST