Man Tuz Jaltarang Viral Video : सोशल मीडियावरील गाण्यांचा ट्रेंड हा रोज बदलताना दिसतो. काही दिवसांपूर्वी ‘एक नंबर तुझी कंबर’ गाणं ट्रेंडमध्ये होतं. तर आता ‘मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज…’ या वैभव जोशींच्या व्हायरल कवितेनं सगळ्यांची मनं जिंकली आहेत. कोणी आपल्या फोटोला, तर कोणी आपल्या व्हिडीओला ही कविता जोडून ट्रेंडमध्ये सहभागी होताना दिसत आहे. तर बऱ्याच महिन्यांपासून सोशल मीडियावर गाजणाऱ्या काकूंच्या ग्रुपनंसुद्धा या कवितेवर जबरदस्त डान्स करून सगळ्यांची मनं जिंकली आहेत.
व्हायरल व्हिडीओत काकूंनी ‘मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज…’ या कवितेवर चक्क डान्स केला आहे. कवितेतील प्रत्येक ओळीवर तीन काकू डान्स करताना दिसत आहेत. तिघींच्या स्टेप्स आणि त्यांचांटायमिंग, त्याचबरोबर त्यांचे हावभाव अगदी बघण्याजोगे आहेत. तुम्हाला एका क्षणासाठी वाटेल या कवितेच्या ओळींवर काय डान्स करायचा. पण, व्हिडीओची सुरुवात होताच तिन्ही काकू सगळ्यांचे लक्ष वेधून घेतात. या वयातही त्यांच्या परफेक्ट डान्स स्टेप्स अन् त्यांचा उत्साह तरुण मंडळींनाही तोडीस तोड असा आहे.
जुने खेळाडू मैदानात उतरले (Viral Video)
अनेक तरुणी आपल्या साडीवरच्या फोटोला ‘मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज…’ ही कविता लावून पोस्ट करताना दिसत आहेत. पण, या काकूंच्या ग्रुपनं तर चक्क या कवितेवर डान्सच केला आहे. काकूंच्या ग्रुपची खासियत म्हणजे कोणतंही नवीन गाणं, कविता ट्रेंडमध्ये आलं की, त्या गाण्यावर, त्या कवितेवर या सगळ्यांनी अगदी साडी नेसून, छान तयार होऊन रील बनवली नाही, असं होणारच नाही. हीच खासियत आणि त्यांची सादगी, अप्रतिम सौंदर्य, डान्स करण्याची कला आज सोशल मीडियावर सगळ्यांच्या पसंतीत उतरते आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @mansi.gawande.73 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “आज गाण्याला खरा न्याय भेटला…”, “जमलं जमलं काकूंना, एक्सिलेन्ट बाकी ज्या मुली फालतूगिरी करून व्हिडीओ करतात त्यांच्यापेक्षा लाख पटीने सुंदर “, “मस्तच”, “वाह्ह क्या बात हैं”, “जुने खेळाडू मैदानात उतरले… आता काय खरं नाय”, “अप्रतिम”, “ट्रेंड विनर”, “जबरदस्त परफॉर्मन्स” आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसत आहेत.