Fishing Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यावर आपण हसता-हसता रडायला लागतो. तर काही व्हिडीओ आपल्याला भावूक करतात. फेसबुक, इन्स्टाग्रामवरचे काही व्हिडीओ पाहून आपल्या तोंडातून आपसुकच ‘वाहह’ असे शब्द बाहेर पडतात. अशाच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण आगळ्या-वेगळ्या पद्धतीने नदीमधील मासे पकडताना दिसत आहे. मासे पकडण्यासाठी त्याने जो जुगाड केला आहे, ते पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

मासेमारी करणे हे जगातील सर्वात अवघड कामांपैकी एक आहे. लांबून पाहणाऱ्याला हे काम खूप सोप्पं आहे असं वाटत असतं. त्यात नदीमध्ये मासे पकडणं बरंच कंटाळवाणं असतं. आपल्याकडे मासेमारी करण्यासाठी मोठमोठ्या जाळ्यांचा वापर केला जातो. परदेशी मासेमारी हा छंद म्हणून जोपासला जातो. तेथे लोक फिशिंग रॉड घेऊन मासे पकडायला जातात. गळाचा खादय लावून मासे गळाला लागेपर्यंत वाट पाहणं थकवणारं असतं. व्हायरल व्हिडीओमधील या तरुणाने मासे पकडणं किती सोप्प काम आहे हे दाखवून दिलं आहे.

A student tried to cheat by bribing teacher shocking video goes viral
बापरे! पास होण्यासाठी विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेत लपून ठेवले २०० रुपये, शिक्षकांना दिसताच…; VIDEO व्हायरल
worlds eldest person
सुदृढ आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी काय लागतं? १९०० मध्ये जन्मलेल्या व्यक्तीनं सांगितलं सोपं गुपित!
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
people washing plates in fountain in wedding
Viral Video : लग्नात सजावटीसाठी लावला होता पाण्याचा कारंजा, पण लोकांनी जेवणाची ताटं धुतली, एकदा व्हिडीओ पाहाच

आणखी वाचा – गौतमी पाटीलनं भर कार्यक्रमात फॅनला स्टेजवरच केलं kiss, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

या व्हिडीओमध्ये तरुण नदीच्या किनाऱ्याजवळ हातामध्ये छोटी बादली हातामध्ये घेऊन उभा असल्याचे दिसते. किनाऱ्याजवळच्या जमिनीला उतार असल्याने वेगाने वाहणाऱ्या पाण्यासह मासे देखील वाहत येत आहेत आणि काही सेकंदांसाठी हवेत उडत आहेत. ही गोष्ट त्या तरुणाने ओळखली आणि तो त्या ठिकाणी छोटी बादली घेऊन उभा राहिला. असे केल्याने पाण्यातले मासे सलग बादलीमध्ये जात आहेत असे पाहायला मिळते. आपल्या बुद्धीचा वापर करुन त्या हुशार तरुणाने पुन्हा एकदा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हे सिद्ध केले आहे.

आणखी वाचा – गौतमी पाटीलचं खरं आडनाव माहितेय का? पुण्यातून पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा, “तुला उलटं पालटं…”

@pubity या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला तब्बल १२.३ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. ३ लाखांपेक्षा जास्त यूजर्सनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. तीन हजारांपेक्षा जास्त कमेंट्स व्हिडीओखाली पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येकजण त्या तरुणाचे कौतुक करत असल्याचे कमेंट्स वाचल्यावर लक्षात येते.