Viral video: सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी कधी तर इतके विचित्र व्हिडीओ पाहायला मिळतात तर कधी मनोरंक व्हिडीओ समोर येतात. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता सगळ्यांसाठी टॅलेंट दाकवण्याचे एक प्लॅटफॉर्म बनले आहे. प्रत्येकजण काही ना काही नवीन कटेंट घेऊन व्हिडीओ बनवत असतो. असे व्हिडीओ अनेकदा लक्ष वेधून घेतात. तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल ही होतात.असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. तुम्ही आतापर्यंत कधी हवेत चालणारा माणूस पाहिला नसेल. सध्या व्हायरल होणारा या तरुणाचा व्हिडीओ पाहून तुमचाही डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. कारण हा तरुण चक्क हवेत चालताना दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या तरुणाचे नेटकरी खूप कौतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून सर्व एकच प्रश्न विचारत आहेत की, बापरे हे कसं शक्य आहे?
व्हिडिओतील तरुणाचे टॅलेंट पाहून तुम्ही थक्क व्हाल. तसे, आपल्या देशात टॅलेंटची कमतरता नाही. आता या तरुणाला पाहून तुम्ही म्हणू शकता की की याच्याकडे एक अद्भुत टॅलेंट आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण चक्क हवेत चालतोय. हे अगदी शंभर टक्के खरं आहे. व्हिडीओ बघितल्यात तुमच्या हे लक्षात येईल. सराव करुन या तरुणाने हवेत चालण्याचं कसब मिळवलेलं आहे.
व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक काळ्या रंगाचा टीशर्ट आणि ग्रे कलरची पँट घातलेला तरूण उभा आहे. या तरुणाच्या अवती भोवती मोठी गर्दी झाली आहे. एका गार्डनमध्ये या तरुणानं आपली कला दाखवली आहे. गर्दीच्या मधोमध एक तरुण स्वत:ची हवेत चालण्याची कला सादर करतोय. यावेळी एक-दोन नव्हे तर चक्क १ पावलं तो हवेवरचं चालतो आहे. लोकांनी केलेलं गोल रिगंण तरुण केवळ हवेत चालून पार करताना दिसत आहे. कोणी हवेत खरंच चालू शकत यावर विश्वास ठेवणं कठीण आहे मात्र हा व्हिडीओ प्रत्यक्ष बघितल्यानंतर यावर विश्वास बसेल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडिओ binde_stunts नावाच्या इंस्टाग्राम यूजरने पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आहे.या व्हिडीओवर लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, या टॅलेंटने भारताबाहेर जाऊ नये. एका इंस्टा युजरने लिहिले की, हा मानवी रूपातील प्राणी आहे. त्याचवेळी एका यूजरने लिहिले की, मागच्या जन्मात घोडा होता का? व्हिडिओवर अशा अनेक कमेंट्स आल्या आहेत.