viral video car stunt on highway : चित्रपटांमध्ये तुम्हाला अनेकदा नायक किंवा खलनायक वेगवेगळे स्टंट करताना दिसतील. तुम्हाला वाटेल की ते किती सहज स्टंट करतात, मात्र वास्तव काही वेगळेच असते. त्यांना स्वतःला सुरक्षित ठेवून स्टंट करत आहोत असे दाखवण्यासाठी सराव करावा लागत. पण, आज कालची मंडळी सोशल मीडियासाठी व्हायरल कंटेंट तयार करण्याच्या प्रयत्नात अगदी खालच्या थराला जातात. काहीतरी आगळीवेगळी स्टंटबाजी करण्यात सुख मानतात. तर आज असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून आश्चर्य वाटेल.

एका तरुणाने हायवेवर धोकादायक स्टंट करून अनेक लोकांचा जीव धोक्यात घातला. ही घटना सुंदरनगर उपविभागांतर्गत किरातपूर-मनाली महामार्गावरील हरबाग येथे घडली आहे. एक अल्टो कारचा चालक चालत्या भरधाव वेगाने गाडी चालवत धोकादायक हालचाली करताना दिसतो आहे. सगळ्यातत पहिला चालक गाडी घेऊन येतो. मग मध्येच थांबवतो. त्यानंतर गोल गिरकी घेतो आणि मग रस्ता ओलांड़ून दुसऱ्या लेनकडे जाण्याचा प्रयत्न करतो. तितक्यात एक जीप ड्रायव्हर तिथे येतो आणि नक्की अल्टो कारचा चालक करतोय काय हेही त्याला कळेना. त्यातच दुसरी अज्ञात व्यक्ती हा प्रकार मोबाईलमध्ये रीलसाठी शूट करीत होती.

निष्काळजीपणा अपघाताला कारणीभूत ठरतो (Viral Video)

या बेफिकीर ड्रायव्हिंगमुळे आजूबाजूच्या वाहनचालकांना अपघात टाळण्यासाठी खूप धडपड करावी लागते. हा प्रकार स्वतःसाठीच नाही तर इतरांच्या जीवासाठीही अतिशय धोकादायक असतो. कारण असे हा स्टंट सार्वजनिक रस्त्यावर केले जातात. त्यामुळे केवळ त्या चालकाचाच नव्हे तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालक आणि प्रवाशांच्याही जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हा व्हिडीओ एका अज्ञात व्यक्तीने शूट केल्याचं सांगितले जात असून, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाचं लक्षही या प्रकरणाकडे वेधले गेले आहे.

व्हिडीओ बघण्यासाठी फोटोवर क्लिक करा…

car stunt viral video

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सुंदरनगर पोलीस ठाण्याने तात्काळ तपास सुरू केला. व्हायरल क्लिपच्या आधारे वाहनचालकावर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांखाली १८ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पोलीसांनी विशेषतः तरुणांना कडक आवाहन केलं आहे की, सोशल मीडियावरील लाईक्स आणि व्ह्यूजसाठी धोकादायक स्टंट करू नयेत. रस्त्यावरचा क्षणभराचा निष्काळजीपणा देखील जीवघेण्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतो; असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @greyarena.in या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.