Lavani Dance Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेकजण डान्सचा आनंद घेताना दिसतात. यात काही लोक तर अगदी बेभान होऊन नाचताना दिसतात. काही हौशी लोकं संधी मिळेल तिथे मन भरून नाचण्याचा आनंद घेतात. यात शाळेमधील स्पर्धा आणि इतर कार्यक्रम हे विद्यार्थ्यांसाठी हक्काचे व्यासपीठ असते, जिथे ते आपली कला मोकळेपणाने सादर करू शकतात. सध्या अशाच एका शाळेमधील डान्स व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक माजी विद्यार्थी शिक्षकांसमोर कमाल लावणी सादर करताना दिसतोय. विद्यार्थ्याचा हा डान्स व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
व्हिडीओत एक माजी विद्यार्थी अशी काय फक्कड लावणी सादर करतो की पाहणारेही चकित झाले. यात तो एका अनुभवी लावणी डान्सरसारखा नाचतोय. लावणी ही महाराष्ट्राची लोककला आहे, जी आजही लोक तितक्याच प्रेमाने जपतायत. या व्हिडीओतही माजी विद्यार्थ्याने कॉलेजमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसमोर अशी काय लावणी सादर केली की पूर्ण वातावरणच बदलून गेले. त्याने दिलखेचक अदाकारीने लावणीच्या प्रत्येक स्टेप एकदम परफेक्ट केल्या. त्याच्या या लावणीपुढे गौतमी पाटील देखील फेल आहे.
व्हिडीओत पाहू शकता, शाळेतील जुने मैत्र- मैत्रिणी बऱ्याच वर्षांनी भेटले. यावेळी एका माजी विद्यार्थ्याने ‘पाव्हणं इचार काय हाय तुमचा’ या गाण्यावर जबरदस्त ठेका धरला. शिक्षक आणि त्याच्या मित्र-मैत्रिणींसमोर तो बेभान होऊन नाचतोय. यावेळी उपस्थितीत लोकही टाळ्या वाजवून त्याचे कौतुक करतायत. लावणीच्या बोलाप्रमाणे त्याच्या स्टेप्सही तितक्याच ठसकेबाज आहेत. त्याचे हावभावदेखील घायाळ करणारे आहेत.
त्याच्या डान्स स्टेप्स आणि नखरेल अदाकारी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय, पुरुष असून तो इतक्या कमालीचे हावभाव, अदाकारी दाखवतोय, जे प्रत्येकालाच जमतं असं नाही.
माजी विद्यार्थ्याचा हा जबरदस्त लावणी व्हिडीओ rajdancer2021नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सही वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, खूप छान दादा. दुसऱ्याने लिहिले की अप्रतिम लावणी सादर केली, कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतील. तिसऱ्याने लिहिले की, महाराष्ट्रामध्ये टॅलेंट आणि कलाकारांची कमी नाही, त्यातील हे उत्तम उदाहरण.
