Bride Marathi Ukhana Goes Viral : लग्नाचं घर म्हटलं की प्रत्येक कार्यक्रमात एक आग्रह हमखास केला जातो, तो म्हणजे उखाणा घेण्याचा. अगदी नव्या नवरीपासून ते विवाहित महिलांपर्यंत, वेगवेगळ्या प्रसंगी पतीचं नाव घेण्यासाठी आग्रह केला जातो. अशावेळी सासरच्यांना आवडेल असा, सासरचा पत्ता सांगणारा किंवा नवऱ्याचं कौतुक करणारा भन्नाट उखाणा घेतला की, तो क्षण खास बनतो. सध्या अशाच एका नव्या नवरीचा उखाणा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे.

नुकतीच बिल्डिंगच्या दारात नवरा-नवरीची वरात आलेली दिसते आहे. बँजो वाजवणारे आणि पाहुणे मंडळी सुद्धा नव्या नवरीचा उखाणा ऐकण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. मग नाव घेऊ का असं नवी नवरी म्हणते आणि सगळे हो म्हंटल्यावर अगदी भन्नाट उखाणा घेते. हा उखाणा म्हणजे “झाले आमचे लग्न, गणेश गल्लीत आली आमची वरात, जमले आहेत सारे बिल्डिंगच्या दारात, प्रतीक राव नाव घेते तुमचं, आता उचलून न्या घरात’ असा उखाणा म्हणते.

उखाणा ऐकताच सगळे जोरजोरात ओरडायला लागतात आणि बँजोच्या तालावर नाचताना दिसतात. अगदी नवरा-नवरी सुद्धा. तर अनेकदा गृहप्रवेशाच्या वेळी नव्या नवरीने घेतलेला लांबलचक आणि मजेशीर उखाणा अनेकांच्या पसंतीस उतरतो. मात्र विशेष म्हणजे, प्रसंगाशी अगदी योग्य जुळणारा उखाणा घेतल्यास उपस्थितांची नवरीला दाद मिळते आणि टाळ्यांचा कडकडाट सुद्धा होतो.तसेच काहीसे या व्हायरल व्हिडीओत बघायला मिळाले आहे.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @its_asmita_9999_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी उखाणा ऐकून वेगेवेगळ्या इमोजीसह नवरीबाईच्या उखाण्याचे कौतुक कमेंटमध्ये केले आहे. तुमच्याही ओळखीत कुणाचं ‘यंदा कर्तव्य असेल’, खासकरून कोण गणेश गल्लीमध्ये राहणारं असेल आणि त्यांचा सुद्धा उखाण्यांचा अभ्यास चालू असेल तर हा व्हिडीओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.