Giant Sandstorm In China Roaring With Horrific Whistles : चीन देशावर सध्या पिवळ्या वादळाचं संकट घोंगावतंय. चीनमधल्या उत्तर पश्चिमी शहरात धुळीची चादर ओढावली आहे. शहरात अचानक आलेल्या धुळीच्या वादळामुळे इथल्या रहिवाशांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या वादळामुळे सुमारे २०० मीटर उंचीइतकी वाळूची भिंत निर्माण झाली आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, सूर्य देखील झाकला गेला होता. शहरातील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. या पिवळ्या वादळाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलाय. वादळ किती भयंकर होतं हे तुम्हाला व्हायरल व्हिडीओ पाहून अंदाज येईल. हा व्हिडीओ पाहताना मनात धडकी भरू लागते.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा धुळीच्या वादळाचा व्हिडीओ चीनच्या उत्तर-पश्चिम भागातला आहे. गेल्या आठवड्यात हे वादळ आले होते. AccuWeather नुसार, बुधवारी हे भयानक धुळीचे वादळ चीनच्या कांजी (किंघाई) मध्ये उद्भवले होते. या व्हिडीओमध्ये धुळीचे वादळ वाळवंटातून आकाशाकडे घोंगावत वाटेत अडकलेल्या वाहनांकडे वेगाने जात असल्याचे दिसत आहे. या वादळाच्या शिट्टीचा आवाज म्हणजे ऐकणाऱ्याचा आत्मा थरथर कापतो.

Pakistani man receive a gift of ancestral home door from India
याला म्हणतात मैत्री! पाकिस्तानी मित्राला पाठवला घराचा दरवाजा, १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदा दरवाजा पाहून…; व्हिडीओ होतोय व्हायरल
Hyundai Motor Company, South Korea, PT Adaro Minerals Indonesia Tbk, agreement, aluminium supply
विश्लेषण :`के-पॉपʼ चाहत्यांसमोर ह्युंदाईचे लोटांगण? इंडोनेशियाबरोबर ॲल्युमिनियम करार का रद्द झाला?
arvind kejriwal arrets
केजरीवालांच्या ‘कट्टर भक्ता’चा देशात बोलबाला; एका व्हिडीओमुळे व्हायरल झालेले राम गुप्ता नेमके कोण?
viral video street vendor selling momo burger
Video : बर्गरमध्ये घातले ‘मोमो अन् नूडल्स’! पण जंक फूडच्या या ढिगावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियांनी व्हाल चकित

आणखी वाचा : ‘या’ रेसॉर्टमध्ये तुम्हाला सकाळी झोपेतून जागे करण्यासाठी रिसेप्शन कॉल नव्हे तर हत्ती येतात! पाहा हा VIRAL VIDEO

सीएनएनने दिलेल्या माहितीनुसार, हे धुळीचे वादळ सुमारे चार तास चालू राहिले, ज्याचा सर्वाधिक फटका हायक्सी मंगोल आणि तिबेट स्वायत्त प्रांताला बसला. वादळामुळे वाहतूक ठप्प झाली आणि स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांना त्यांच्या घरात आसरा घ्यावा लागला. या वादळाचं वैशिष्ट्य म्हणजे या वादळामुळे आकाशाचा रंग पिवळा-नारिंगी होऊन गेला. चीनचं हे पिवळ्या रंगाचं वादळ शेजारी देशांना अनेकदा घाबरवत असतं. २०२० च्या ऑक्टोबर महिन्यातही वाळवंटात असंच विनाशकारी वादळ उठलं होतं.

आणखी वाचा : बाबा रे! मॉलमध्ये मुलीने मुलाला लाथा-बुक्क्या आणि चपलीने धू-धू धुतलं, या मारहाणीचा VIDEO VIRAL

सुदैवाने या धुळीच्या वादळामुळे कोणतेही नुकसान झाले नाही. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टमधील आणखी एका अहवालात म्हटले आहे की या मोठ्या वादळामुळे दृश्यमानता २०० मीटरपेक्षा कमी होती आणि वाळूच्या वादळाने सूर्यालाही झाकले होते. दरम्यान, चीनलाही झपाट्याने वाढणाऱ्या तापमानाचा सामना करावा लागत आहे. जगातील इतर देशांप्रमाणे येथेही खूप उष्मा होत आहे. AccuWeather च्या मते, जूनच्या मध्यापासून उत्तर, पूर्व आणि मध्य चीनच्या मोठ्या भागात उच्च तापमान कायम आहे. चीनमध्ये येत्या काही दिवसांत उष्णतेपासून दिलासा मिळण्याची आशा नाही, असे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

आणखी वाचा : किती गोड! बाप-लेकीच्या घट्ट नात्याचा VIDEO VIRAL, पाहून तुम्हीही व्हाल भावूक

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : ‘पुन्हा खोड काढलीस तर याद राख’; चिडलेल्या माकडाने मुलीला अशी घडवली अद्दल, पाहा हा VIRAL VIDEO

काय आहे पिवळं वादळ?
Yellow Dust अर्थात पिवळ्या धुळीमुळे या वादळाला पिवळं वादळ म्हणतात. चीन आणि इनर मंगोलियातून उडणारी ही धूळ पिवळ्या रंगाची असते. तिला चायना डस्ट किंवा एशियन डस्ट असंही म्हणतात. दर वर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांदरम्यान ही धूळ उडताना दिसते. त्याचं कारण म्हणजे या कालावधीत वाहणारे जोरदार वारे. या वाऱ्यांमुळे वाळूचे हलके कण वाळवंटातून उडून चीनसह उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि जपानचा आसमंतही व्यापून टाकतात.