आपल्या प्रत्येकाच्या ओळखीत एक तरी अशी व्यक्ती असते की जी गाडी अगदी आरामात चालवू शकते. आरामात म्हणजे म्हणाल तिथे गाडी चालवण्याचं कौशल्य या व्यक्तींकडे असते. कधीतरी अशा व्यक्ती जीवावर उदार होऊन आपलं ड्रायव्हींग स्कील्स दाखवतात असं वाटतं. मात्र त्यांना आपल्या कौशल्यावर पूर्ण विश्वास असतो आणि त्यामुळेच अशक्य वाटणाऱ्या गोष्टी ते स्टेअरिंगच्या मागे बसून करु दाखवतात. अनेकदा अशा लोकांचं कौशल्य पाहून तोंडात बोटं घालण्याची वेळ येते. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिजीन नावाच्या ट्वीटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये एक एसयूव्ही गाडी एका अरुंद रस्त्यावर अडकलेली दिसत आहे. उतार असलेल्या एका रस्त्यावर गाडीचा चालक गाडी पूर्ण वळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हा रस्ता इतका अरुंद आहे की पहिल्यांदा गाडी या रस्त्यावर आणि ती सुद्धा इनोव्ह वगैरेसारखी सेव्हन सीटर गाडी वळू शकते यावर विश्वासच बसत नाही. या उतारावरुन गाडी खाली येत असल्याचं आणि चालक गाडी वळवत असल्याचं पाहून मागील बाजूला असणाऱ्या रस्त्यावरुन येणारा चालकही स्वत:ची गाडी थांबवून हे प्रयत्न पाहताना दिसतोय.

जसजसा व्हिडीओ पुढे जातो तसे काळजाचे ठोसे चुकतात की काय असंही वाटू लगातं. कारण इंच अन् इंच जमीन लढवत हा चालक या अरुंद रस्त्यावर गाडी वळवतो. विशेष म्हणजे या रस्त्याच्या एकाबाजूला काही फुटांचा खोलगट भाग दिसतोय. अगदी गाडी या कठड्यावरुन एक चाक खाली उतरुनही पुन्हा वर निघते.

गाडी इंच अन् इंच पुढे मागे करत गाडीची चाकं वळवत हा चालक गाडी हळूहळू वळवतो. या व्हिडीओमध्ये अनेकदा गाडीचं चाक अधांतरी किंवा त्या कठड्यावरुन खाली उतरण्यापासून अगदी इंचभर कमी अंतरावर असल्याचं दिसतं. अगदीच अशक्य वाटणारं हे वळण पूर्णपणे यशस्वी होणार की गाडी खाली पडणार अशी धाकधूक लागलेली असताना या गाडीचा चालक मात्र तितक्याच आत्मविश्वासाने गाडी पूर्णपणे वळवतो. बऱ्याचदा गाडी पुढे मागे घेतल्यानंतर पूर्ण होतं. मास्टर ड्रायव्हर अशा कॅप्शनसहीत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.

अनेकांनी हा व्हिडीओ थक्क करणारा असल्याचं सांगतानाच या चालकाची हिंमत कौतुकास्पद असल्याचं म्हटलं आहे. ६२ हजारांहून अधिक वेळा हा व्हिडीओ रिट्वीट करुन शेअर करण्यात आला आहे. या २९ सेकंदांच्या व्हिडीओला दोन कोटी ८० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video master drivers impossible turn on risky edge leaves internet amazed scsg
First published on: 25-10-2022 at 13:07 IST