viral video dance on vinchu chawla song : जुन्या गाण्यांवर रील बनवण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. एखादं जुनं गाणं नव्या ढंगात इन्स्टाग्रामद्वारे प्रेक्षकांपुढे सादर केली जातात. मग या गाण्यांवर रील बनवण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. समाजमाध्यमांवर अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकजण आपली कला सादर करताना दिसतात. तर आज एका जोडप्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे, जो तुम्हाला इतका आवडेल की, तुम्ही पुन्हा पुन्हा बघून तुमच्या इन्स्टाग्राममध्ये नक्की सेव्ह करून ठेवाल किंवा या गाण्यावर डान्स तरी करून बघाल.

व्हिडीओत डान्स करणारे इन्स्टाग्राम युजर मयुरेश हा डान्सर असून निकिता एक आई सुद्धा आहे. या दोघांनी मिळून विंचू चावला या गाण्यावर जबरदस्त डान्स केलेला दिसतो आहे. निकिताने लाल साडी नेसली असून ती मयुरेशला अगदी टक्कर देऊन नाचताना दिसते आहे. दोघांचा नाचताना टाईमिंग, हावभाव, स्टेप्स तुम्हाला कुठेही चुकलेल्या दिसणार नाहीत. एवढंच नाही तर साडीत केलेला इतका सुंदर डान्स तुम्ही आजवर कधीच केलेला पाहिला नसेल. एकदा बघाच दोघांचा सुंदर डान्स व्हिडीओ…

आपल्यापैकी अनेकांना डान्स करायला भरपूर आवडते. त्यातच इन्स्टाग्रामवर असे डान्स व्हिडीओ दिसायला लागले की, आपल्यातील अनेक जण हा व्हिडिओ थांबून पुन्हा पुन्हा बघतात, डान्स करण्याचा किंवा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतात तर काही जण अगदी सेव्ह करून काही दिवसांनी पुन्हा बघतात. त्यामुळे असे व्हिडीओ नेटकाऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसतात. आज व्हायरल होणाऱ्या व्हिडीओने सुद्धा सोशल मीडियावर असाच काहीसा धुमाकूळ घातला आहे. तुम्हीसुद्धा बघा हा जबरदस्त डान्स…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ mayuresh_bagal आणि nikita2990 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच “विंचू चावला” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. “विंचू चावला आणि भाऊ व्हायरल झाला. मिलियनमध्ये व्युव्हज येणार”, आईसाहेब कमाल”, “खुप वेळा पाहिले तरी मन भरलं नाही शेवटी व्हिडीओ सेव्ह करून ठेवला”, “खूप छान” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.