Viral Video Mentally Challenged Man Give 10 Rupees To Bride : मध्यमवर्गीय नेहमची श्रीमंत होण्याचा विचार करतात. पण, नेहमी पैशांची श्रीमंती महत्त्वाची नसते. तर तुम्ही मनापासून एखादी गोष्ट दिली किंवा केली तरीही ती अमूल्य ठरते. तुम्ही कोणाला रस्ता ओलांडताना मदत करतात, एखाद्या उपाशी मनाला खाऊ घालता, गरजू व्यक्तींकडून वस्तू विकत घेता; ही देखील एक प्रकारे माणुसकीची श्रीमंतीच असते, जी फार कमी लोकांमध्ये दिसून येते. तर आसाममधील एका लग्नसमारंभातील अशाच एक एका हृदयस्पर्शी क्षणाने इंटरनेटचे लक्ष वेधून घेतले आहे.
व्हायरल व्हिडीओ लग्न समारंभातील आहे. एक मानसिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती अनपेक्षितपणे शांतपणे लग्नाच्या ठिकाणी आला. त्यानंतर जेवणाच्या वेळी पाहुण्यांमध्ये अगदी आश्चर्य वाटेल असा सामील झाला. त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी किंवा त्याला परत पाठवण्याऐवजी, त्याच्या कुटुंबीयांनी त्याचे आपुलकीने स्वागत केले आणि त्याला इतरांबरोबर जेवण्याची परवानगी सुद्धा दिली. एवढंच नाही तर लग्न समारंभातून निघण्यापूर्वी त्याने जी कृती केली ती अगदी कौतुकास्पद ठरली.
त्याने आपल्या खिशात हात घातला, एक चुरगळलेली १० रुपयांची नोट बाहेर काढली आणि ‘शगुन’ म्हणून ती नवरीच्या हातात ठेवली. स्वतःकडे खूप कमी असूनही, नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद म्हणून त्यांनी मनापासून ती छोटीशी रक्कम दिली. ही भावूक कृती सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. अनेकांनी म्हटलं की, लग्नात दिल्या जाणाऱ्या महागड्या भेटवस्तू किंवा पैशांच्या पाकिटांपेक्षा त्या १० रुपयांच्या नोटेची किंमत खूप जास्त होती. एकदा बघाच व्हायरल होणारा हा व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @idhe_gurtupettuko या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून भावूक झाले आहेत आणि “त्यांनी श्रीमंतीतून नाही, तर स्वतःच्या गरिबीतून दिलं. त्या १० रुपयांच्या नोटेत लाखोंची किंमत नव्हती, पण, मनापासून दिलेल्या शुभेच्छांची अमूल्य भावना होती. खरंच मनाला भिडणारी गोष्ट”, “अशा घटना पाहिल्या की, नेहमी या ओळी आठवतात —“पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा…खरी माणुसकी, प्रेम आणि आशीर्वाद अनेकदा साध्या माणसांच्या रूपात भेटतात”, “
