Viral video: नवरा बायकोच्या नात्याची रेशीम गाठ असते नाजूक, पण लग्न झाल्यानंतर नातं फुलत जातं तशी ही गाठ घट्ट होत जाते. आपली जोडी ही परमेश्वरानं स्वर्गातच बनवली असा जरी विश्वास असला तरी हे नातं प्रत्यक्षात टिकून राहाण्यासाठी नवरा बायको यांनाच प्रयत्न करावे लागतात. नवरा बायकोचे नाते म्हणजे उन सावलीचा खेळ. कधी रुसवा कधी फुगवा तर कधी खळखळून वाहणारा हास्याचा धबधबा. त्यामुळे या प्रेमात अनेकदा शब्दांचा वापर होतोच किंवा हे प्रेम शब्दात व्यक्त करता येतेच असे नाही. नवराब-बायको जसे सुखात एकत्र असतात तसेच एकमेकांच्या दुख:तही सारखेच भागीदार होतात तेव्हा ते नात आणखी टिकतं. नवरा बायकोचं नातं असं आहे की कितीही भांडले तरीही ते एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. आपली व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूरावते तेव्हा तिची खरी किंमत आपल्याला समजते. पती-पत्नीमध्ये कितीही वाद होत असले तरी मनात प्रेमही तितकेच असते. अलिकडेच एक भावूक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात पती आपल्या हरवलेल्या पत्नीला ३ महिन्यानंतर भेटला..यावेळी काय घडलं तुम्हीच पाहा.. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये असा दावा केला जात आहे की, बऱ्याच काळापासून व्यक्तीची पत्नी हरवली होती. खूप शोध घेतल्यानंतरही पत्नी सापडली नाही तेव्हा तिच्या भेटीचा विचार मनातून अखेर जातंच होता तितक्यात एक चमत्कार घडला. व्हायरल व्हिडिओमध्ये पती-पत्नीची आगळी भेट दिसून येतात ज्यात मोठ्या दुराव्यानंतर पत्नीला पाहून पती भावूक होत रडताना दिसून येतो. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सोशल मिडियावर दिलेल्या माहितीनुसार, महिला साधारण तीन महिन्यांपासून बेपत्ता होती. असे म्हटले जाते की, ती मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होती. व्हिडिओमध्ये महिलेच्या बेपत्ता होण्याचे कारण स्पष्ट करण्यात आलं नाही तथापि पतीच्या प्रतिक्रियेने अनेक यूजर्सने भावूक केलं आहे. त्याची प्रतिक्रिया सांगते की, हे तीन महिने त्याच्यासाठी किती कठीण झाले असतील. आपल्या कुटुंबातील सदस्य बेपत्ता होणे साधी गोष्ट नाही. यामुळे कुटुंबावर मानसिक आणि भावनिक तणाव वाढतो. पत्नीसाठी पतीला रडताना आजवर फारसं कुणी पाहिलं नाही ज्यामुळे पतीची ही रिएक्शन आता सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत ठरत आहे.
पाहा व्हिडीओ
हा व्हिडिओ @rajini198022409 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
