Viral Video Mom scolds monkey : प्राणी असो किंवा माणूस प्रत्येक जण आईला घाबरतो, तिचं ऐकतो. घरी यायला उशीर झाला, न कळवता बाहेरून खाऊन आलो, बराच वेळ फोन उचलला नाही, अगदी छत्री घरी विसरलो तरीही आईचा ओरडा पडणार याची कल्पना आपल्या सगळ्यांनाच असते. त्यामुळे वय काहीही असो, माणूस असो किंवा प्राणी असो आईच्या ओरड्यापासून आपल्या कोणाचीच कधी सुटका नसते. एवढंच नाही तिचे म्हणणे ती अगदी प्राण्यालाही पटवून देऊ शकते याचे प्रात्यक्षिक व्हायरल व्हिडीओत बघायला मिळाले आहे.
व्हायरल व्हिडीओत एक महिला आईप्रमाणे कठोर, प्रेमळ आणि काळजीने भरकटलेल्या माकडाची काळजी घेताना दिसत आहे. दाराबाहेर भिंतीवर बसलेले माकड साबणाची वडी खाऊ समजून खाण्याचा प्रयत्न करत होता. आईच्या लक्षात आल्यावर ती माकडावर रागावते, त्याला ओरडते आणि साबण टाकून बटाटा खाण्याचा सुरक्षित पर्याय देते. जेव्हा माकड आईच्या हातातून बटाटा घेऊन साबण फेकून देतो, तेव्हा आईला यश मिळते. माकड पळून जातो आणि आई त्याला बाय म्हणतं निरोप देताना दिसते.
आई शेवटी आईच असते (Viral Video)
एखादा जंगलातला प्राणी दिसला की, आपण खिडक्या, दार बंद करून घेतो किंवा अगदी त्याला हकलवण्याच्या मागे लागलेलो असतो. पण व्हायरल व्हिडीओत आईने जे केलं अगदी कौतुकास्पद आहे. साबण खाणाऱ्या माकडाला तिने स्वतःच्या लेकराप्रमाणे शिस्त लावली. हा व्हिडीओ जरी खूप छोटा असला, तरी त्यात खूप माया आणि आपुलकी भरलेली दिसते आहे. एका वन्य प्राण्याची आईसारखी काळजी दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. एकदा बघाच माकड आणि आईचा हा जबरदस्त व्हिडीओ…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @the_ultimateboss_pritam119 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून ‘काकींनी तर जबरदस्त पेरेंटिंग स्किल्स शिकून घेतल्या आहेत”, “आईला माकड हाताळायची सवयच आहे असं वाटतं”, “आमच्या घरातही अशीच परिस्थिती असते”, “मीसुद्धा हळूहळू अशीच बाई बनते आहे” याशिवाय अनेक लोकांनी या पोस्टवर हसणारे (LOL) इमोजी देऊन प्रतिक्रिया दिल्या आहेत ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आल्या आहेत…
