Mother & Son Viral Video : एखाद्या माणसात असलेली कला कधीच त्याला उपाशी राहू देत नाही असे म्हणतात. मेहनत करून एखादे काम करू पण कोणापुढे हात नाही पसरणार. त्यातच जेवण बनवण्याची कला काही लोकांमध्ये अवगत असते. पण, जेवण करायचं आहे म्हंटल्यावर सगळ्यात आधी स्त्रियांचा चेहरा आठवतो. पण, बदलत्या काळानुसार पुरुषही जेवण बनवण्याच्या क्षेत्रात आणि स्त्रियांची मदत करण्यासाठी जेवण बनवू लागले आहेत. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
जेवण बनवण्याची कला स्वतःला व इतरांना उपाशी राहू देत नाही असे म्हणतात. त्यामुळे व्हायरल व्हिडीओतील आई लेकाला जेवण बनवण्याचे प्रशिक्षण देताना दिसते आहे. आईने एका हाताने परात पकडून ठेवते आणि लेक भाकरीचे पीठ मळून घेण्यास सुरुवात करतो. त्यानंतर लेक दोन्ही हाताने गोलाकार भाकरी थापताना दिसतो. एवढेच नाही तर तो एवढी परफेक्ट गोल भाकरी बनवतो की, पाहणारेही थक्क होऊन जातील एवढे तर नक्की…
हक्काची भाकर सुखा समाधानाने खायची (Viral Video)
पुरूष आसो किंवा स्त्री प्रत्येकाला स्वयंपाक आलाच पाहीजे. कारण – घरी कोण नसलं की, पटकन स्वतःसाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी वरण-भात, भाजी-भाकरी करून त्याचे सेवन करता आले पाहिजे. यासाठीच कदाचित व्हायरल व्हिडीओतील आई आपल्या लेकाला भाकरीचे पीठ कसे मळायचे आणि भाकरी कशी थापायची याबद्दल प्रशिक्षण देताना दिसत आहे.
व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लीक करा…
https://www.instagram.com/reel/DKZljM5MKk7/?igsh=MWhxMDlkMDVpbmRybQ%3D%3D
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @official_sahilya__09 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून चिमुकल्याचा कौतुक करत “पुरूष आसो किंवा स्त्री स्वयंपाक आलाच पाहीजे”, “अगदी खरं! आई ने शिकवलेली ही कला….कधी कोणा समोर हात पसरायचे नाही, कष्ट करायचं आणि हक्काची भाकर सुखा समाधानाने खायची”, “कला ही कोणालाच उपाशी राहू देत नाही”, जगण शिकलास बाळा, भाकरी गोल आली की दुनिया दारी समजली”, “माझ्या आई बारा वर्षे आजारी होती. अशी सगळी काम मी करायचो आता.. आई तर नाही आहे पण त्या सगळ्या आठवणी आहेत” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.
