pregnant lady dance on bai mala g ved lavla song : आई होणं हा एका स्त्रीच्या आयुष्यातील सगळ्यात सुंदर प्रवास असतो. हा प्रवास जेव्हा तिला अनुभवायला मिळतो. तेव्हा आनंद तर असतोच. पण, नकळत कुठेतरी जबाबदाऱ्याही वाढतात. मग बाळ होण्याआधी प्रत्येक जण आपाआपल्यापरीने होणाऱ्या आईला ‘हे कर, हे करू नकोस’, ‘हे खा, हे खाऊ नकोस’ ; असे म्हणत असतात. असा एक गर्भवती महिलेचा डोहाळे जेवणातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे, यामध्ये महिलेने केलेला डान्स पाहून अनेक जण तिला ट्रोल करताना दिसत आहेत.
गर्भवती महिलेचे तुम्ही इन्स्टाग्राम अकाउंट पाहिलेत तर ती डान्सर असल्याचे समजते आहे. डान्सर असल्यामुळे ती स्वतःच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात नाचणार नाही असं तर होणार नाही. तर काही चिमुकल्यांबरोबर मिळून तिने स्वतःच्या बाळासाठी ओटीभरणीत ‘बाई, मला गं वेड लावलं’ या गाण्यावर डान्स केला आहे. तिच्या सुंदर, तिचे सुंदर हावभाव आणि ती आई होणार असल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसतो आहे आणि तिच्या बरोबर असणाऱ्या चिमुकल्यांनी सुद्धा गर्भवती महिलेला पुरेपूर साथ दिली आहे.
व्हिडीओ शेअर करत आईने आई आपल्या बाळासाठी ‘गर्भवती महिलेने ७व्या महिन्यात डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात “वेड लावलय” या गाण्यावर खास डान्स केला. पोटात बाळ असताना डान्स करण्याचा अनुभव माझ्यासाठी खूप खास आणि सुंदर होता. डान्समधील प्रत्येक ठेका, प्रत्येक स्टेप आणि प्रत्येक हास्य माझ्या बाळासाठीच होतं. पोटात असलेल्या छोट्या बाळाबरोबर डान्स केल्यासारखं वाटलं’ ; अशी कॅप्शन तिने व्हिडीओला दिली आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @frombumptobaby2026 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून ‘नाचते ही, धाकधूक मला होते….जरा आरामात नाचा’, डोहाळे कसलीही लागू शकतो प्रेग्नेंसी मध्ये कोणाला नाचायचे डोहाळे लागतात तर कोणाला धावायचे सगळं एन्जॉय करायचं लाजायचं नाही घाबरायचं नाही. मला तरी आवडले’, ‘छोटू डांसर होणार’, ‘एक नंबर डान्स पण जरा काळजी घे. अनेक आशिर्वाद’, ‘जेवढे आई डान्सर असते म्हणते तेवढा बाळ पण खूप डान्सरस निघतो’ ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत.
