Mother Dance Video Viral : लग्नानंतर एका स्त्रीच्या आयुष्यात मोठे बदल होतात. ती बायकोबरोबरच सून, वहिनी आणि काही वर्षांनी आई सुद्धा होते. आई होणं हा प्रवास जितका आनंद देतो तितकाच तो कठीण सुद्धा असतो. पण, बाळ जन्माला आल्यावर तिच्या आयुष्याची पुन्हा एकदा नव्याने सुरुवात होते. आई होणं बाईचा दुसरा जन्म असतो असं म्हणतात. तर हाच दुसरा जन्म एक आई अगदी आनंदात साजरा करताना दिसते आहे. सोशल मीडियावर बारश्याचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे.

बाळाला जन्म दिल्यानंतर अवघ्या ३ महिन्यांनंतर आईचे शरीर हळूहळू सावरत असते. झोप पूर्ण होत नाही, ऊर्जा कमी होते, हार्मोन्सही स्थिर होत असतात. तरीही व्हायरल व्हिडीओतील भरतनाट्यम करणाऱ्या आईने मुलाच्या बारशाला काहीतरी खास केले. सुंदर नृत्य सादर करून तो क्षण आणखीन खास बनवला. व्हिडीओतील आईसाठी नृत्य हे नेहमीच भावना व्यक्त करण्याचं सर्वात नैसर्गिक माध्यम राहिलं आहे आणि त्यामुळे तिने आपल्या मुलाच्या बारश्याची सोन्यासारखी संधी सोडली नाही.

“आईपण म्हणजे ताकद, चिकाटी आणि प्रेम (Viral Video)

काही दिवसांपूर्वी वेगवेगळी विनोदी, अर्थहीन नावे ठेवणाऱ्या आई-वडिलांचे व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाले होते. पण, आज या आईने मुलाच्या बारशाच्या दिवशी डान्स करून त्याने स्वतःची आवड पूर्ण करत बाळाचे अनोखे स्वागत केले. फक्त डिलिव्हरी नंतर ३ महिन्यात डान्स करणे वाटते तितके सोपे नसते. पण, या आईने बाळाचं बारसं आठवणीत राहील आईसाठी “ओ रे बंसी बजाइया” या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. एकदा बघाच आईचा चिमुकल्यासाठी केलेला सुंदर डान्स…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @pricepointstories या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “सर्व मातांना मनापासून सलाम” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी सुद्धा व्हिडीओ पाहून आई तुमच्या पाठीशी उभी असेल, तर सगळं काही परफेक्ट वाटतं आणि याच सुंदर क्षणाला कॅमेऱ्यात टिपलं आहे”, “आईपण म्हणजे ताकद, चिकाटी आणि प्रेम यांचं सुंदर रूप आहे”, “मातृत्व ही सर्वात सुंदर भावना आहे” आदी अनेकविध कमेंट्स व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत.