Viral Video: रील्स म्हणजे सोशल मीडियावरची एक करमणूकच. अशात या रील्सद्वारे अनेक लोक आपली कला सादर करतात. वेळ मिळेल तसा आपला छंद जोपसतात आणि व्हिडीओमार्फत लोकांपर्यंत पोहोचवतात. अभिनय, डान्स, गाणी सादर करणाऱ्या अशा अनेक प्रकारच्या रील्स सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात.

या रील्समुळे सोशल मीडियाच्या जगात रातोरात कोण प्रसिद्ध होईल सांगता येत नाही. अशात सध्या असाच एक आई आणि मुलीच्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकांनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे.

आई आणि मुलीचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्याप्रमाणे आपल्या लेकरांना जपणारी आई प्रत्यही अनेकदा संकटांना सामोरी जात असते. तसंच सगळ्याच बाबतीत अगदी खंबीरपणे आपल्या लेकीच्या मागे उभी असते. तिच्या साथीने सगळं काही शक्य आहे असं जणू ती आपल्या लेकीला सांगत असते. सध्या मायलेकीचा व्हिडीओ असाच आहे. ज्यात दोघी अगदी एकमेकींच्या साथीने अगदी जबरदस्त डान्स करताना दिसतायत.

व्हायरल व्हिडीओ (Mother Daughter Dance Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत मायलेकी जबरदस्त थिरकताना दिसतायत. चंद्रा गाण्यावर दोघींनी तुफान डान्स केला आहे. एकापेक्षा एक अशा डान्स स्टेप्स करत दोघींनी सगळ्यांना घायाळ केलं आहे. यात आईच्या डान्स स्टेप्सचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @varadavishwanath या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून जेव्हा तुमची गुरू तुमची आई असते असं कॅप्शन देण्यात आलेलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच या व्हिडीओला काही वेळातच तब्बल ६२६ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी कमेंट करत लिहिलं, “अगं.. कसली भारी नाचलीय आई.. माझा दंडवत सांग आईला”, तर एकाने कमेंट करत लिहिलं “काकी काय नाचताय तुम्ही, एकच नंबर”, अशी कमेंट केली. तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आई शप्पथ खूप प्रेम काकूंना, खूप सुंदर“