scorecardresearch

वनकर्मचाऱ्यांनी घडवून दिली हरवलेल्या हत्तीच्या पिल्लाची आईशी भेट; माता हत्तीने देखील दिला सोंडेने आशीर्वाद

सध्या ट्विटरवर भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक माता हत्ती वन अधिकार्‍यांना तिच्या हरवलेल्या पिल्लाला पुन्हा भेटवल्याबद्दल आशीर्वाद देत आहे.

वनकर्मचाऱ्यांनी घडवून दिली हरवलेल्या हत्तीच्या पिल्लाची आईशी भेट; माता हत्तीने देखील दिला सोंडेने आशीर्वाद
photo(social media)

हत्ती हे बलाढ्य आणि शांत प्राणी आहेत. ते फिरताना नेहमी कळपात फिरतात. त्यांच्यासोबत फिरताना त्यांची पिल्ले देखील सोबत असतात. कधीकधी ही पिल्ले फिरताना त्यांच्या पिल्लांपासून वेगळी होतात. त्यानंतर त्यांना पुन्हा एकत्र करावे लागते. सध्या ट्विटरवर भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी सुसंता नंदा यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये एक माता हत्ती वन अधिकार्‍यांना तिच्या हरवलेल्या पिल्लाला पुन्हा भेटवल्याबद्दल आशीर्वाद देत आहे.

श्री नंदा यांनी गुरुवारी हा व्हिडिओ शेअर केला आणि त्याला १३००० हून अधिक व्ह्यूज आणि ११०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कॅप्शनमध्ये, IFS अधिकाऱ्याने लिहिले, “तो आशीर्वाद.. वन कर्मचाऱ्यांनी या बछड्याची त्याच्या आईसोबत भेट करुन दिली. बाळासोबत त्याच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी माता त्यांना आशीर्वाद देतेय.”

( हे ही वाचा: सौदी अरेबियेत सापडले सोनं, तांब्याचे प्रचंड साठे; मदिनेतील साठ्यांमुळे सरकार होणार मालामाल)

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: VIDEO: पाण्यात मगरीची नाही तर कुत्र्याची दहशत; केला थरकाप उडवणारा हल्ला, पाहा हा व्हिडीओ)

इंटरनेट वापरकर्त्यांनी तामिळनाडू वन अधिकार्‍यांच्या कृतीचे कौतुक केले आणि वेगवेगळ्या कंमेंट देखील केल्या आहेत. दरम्यान, ते जंगलात शूट केलेले असोत किंवा बंदिवासात, हत्तींचे व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार पोस्ट केले जातात. या महिन्याच्या सुरुवातीला, छत्तीसगडचे वन अधिकारी आपल्या कळपापासून वेगळे झालेल्या हत्तीच्या बछड्याला मदत करताना एका व्हिडिओमध्येही दिसून आले होते. वनकर्मचाऱ्यांनी हत्तीच्या बाळाची सुटका केली आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेण्यापूर्वी प्राथमिक आरोग्य तपासणीही केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-09-2022 at 19:17 IST

संबंधित बातम्या