viral video mother hold child to help urinating : ट्रेन, रेल्वेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची माणसं दिसतील. कोण सीटसाठी भांडतंय, कोण तंबाखू, पान खाऊन थुंकतयं, कोण दरवाजाला लटकतंय, कोण इतर प्रवाशांना त्रास देतंय, कोण अगदी आपापसात भांडतंय, तर कोण प्रवासाची अगदी मनापासून मजा घेताना दिसतो आहे. पण, आज सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे, जो पाहून तुम्ही अक्षरशः डोक्याला हात माराल. एका आईने स्वतःच्या सोयीसाठी की, कंटाळा माहिती नाही मुलाला लघुशंका करण्यासाठी खिडकीकडे उभे केले.

रेल्वेमध्ये एक कुटुंब (आई, बाबा आणि त्यांचा मुलगा) प्रवास करत असते. यादरम्यान चिमुकल्याला टॉयलेटला (लघुशंका) जायचे असते. सहसा रेल्वेमध्ये टॉयलेट उपलब्ध असतात. पण, या महिलेने स्वतःच्या मुलाची आणि इतर प्रवाशांच्या सुरक्षेचा, स्वच्छतेचा कोणताही विचार न करता आपल्या लहान मुलाला चालत्या ट्रेनच्या खिडकीबाहेर धरून ठेवले आणि तिथेच लघुशंका करण्यास मुलाने सुरुवात केली. रेल्वेमध्ये असणाऱ्या एका सहप्रवाशाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

‘अरे काय झालं, बाळच तर आहे’ (Viral Video)

ट्रेन वेगाने चालू असताना आसपासचे प्रवासी हा प्रकार पाहत होते. हा प्रसंग पाहून अनेक लोक घाबरले, कारण यात मोठा धोका होता. चालत्या ट्रेनमध्ये जर थोडीशी चूक झाली किंवा आईचा धक्का लागला असता तर गंभीर अपघात होऊ शकला असता. त्यातच त्या कुटुंबानंतर अनेक प्रवासी खिडकीपाशी बसणार, प्रवासाचा आनंद घेत नकळत हात सुद्धा ठेवणार; त्यामुळे इथे नागरिकांच्या अस्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकदा बघाच आई आणि चिमुकल्याचा हा धक्कादायक व्हायरल व्हिडीओ…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @indians या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये या घटनेचे वर्णन करण्यात आले आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “नियम, सुरक्षितता किंवा शिस्त याकडे दुर्लक्ष करून ‘चालतं रे ठीक आहे’ असं भारतीयांनी डोक्यात ठेवलं आहे”, “कधी सुधारणार हे लोकं”, “त्या आईचे हावभाव ‘अरे काय झालं, बाळच तर आहे’ ही भावना व्यक्त करत आहेत”, “माणसंच अशी असतील तर सोयी-सुविधांना नाव ठेवून पण काय फायदा” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…