mother in law welcome daughter in law viral video : घरात भांडणं होण्यास कधी कधी सासू आणि सूनेचे भांडण कारणीभूत असते असे हमखास म्हटले जाते. त्यामुळे सासू आणि सूनेचं नातं कसं असावं यावर घरातील प्रत्येक गोष्ट अवलंबून असते. ‘माझं घर आहे सगळं माझ्या मनासारखं होणार’ असं सासू तर ‘मी नवीन आल्यावर सगळं बदलणार’ असं सून म्हणाली तर हे भांडण कदाचित कधीच नाही मिटणार. त्यामुळे बदलत्या काळात सुनेला आपल्या लेकीसारखं प्रेम देणारी सासू सुद्धा अनेकांना दिसू लागली आहे. आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
डॉक्टर सौम्या गुप्ता प्लास्टिक सर्जन आहेत. नुकत्याच ५० तासाच्या ड्युटीनंतर त्या घरी आल्या. त्यांच्या हातात कामाचे कागद, खांद्यावर बॅग असते. पण, त्या दारात येण्याआधीच, त्यांचा थकवा दूर करण्यासाठी त्यांची सासू आरतीचे ताट हातात घेऊन उभी असते. दोन दिवसांहून अधिक काळ रुग्ण सेवेत घालवल्यामुळे सासू अगदी सुंदररित्या सुनेचं औक्षण करून टिक्का सुद्धा लावतात आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी ‘आमचे अहोभाग्य जे तुम्ही आमच्या घरी आलात. अशी सून पाहिली आहे का? जी चार-चार दिवसांनी घरी येते’ असं गंमतीत म्हणते.
सासू असावी तर अशी, आईसारखी जपणारी (Viral Video)
हे ऐकून डॉक्टर सौम्या गुप्ता देखील सासूच्या पाया पडून ‘देव मला घरी राहण्याची बुद्धी देवो’ असे मजेत म्हणताना दिसते आणि मग त्यांची घरात एंट्री होते. सोशल मीडियावार व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kansal2708 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. सासू सुनेचा प्रेमळ संवाद काही जणांना आवडला तर काही जणांनी “सासूने टोमणा मारला” असे म्हणताना दिसत आहेत. अशा अनेक नाकारात्मक कमेंट्स पाहून डॉक्टर सौम्या गुप्ताच्या नवऱ्याने स्पष्टीकरण दिले आहे.
व्हिडीओ नक्की बघा…
पती शगुन अग्रवाल म्हणाले की, “जी मंडळी माझ्या आईच्या वाक्यांवर टीका करत आहेत. कदाचित त्यांना अशा सकारात्मक कुटुंबाचा अनुभव नसावा, त्यामुळे त्यांना इथे ते चांगुलपण दिसत नाही. जे लोक म्हणतायंत आई हे सगळं पैशासाठी करते. तर तसं नाही. माझ्या आईचं उत्पन्न (rental income) माझ्या आणि माझ्या पत्नीच्या पगारापेक्षा खूप जास्त आहे. जे लोक “कशी सासू आहे” असं बोलत आहेत, त्यांना सांगू इच्छितो की माझी आई रोज ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये पाठवते, जेणेकरून तिला (रुग्णाला) रोज गरम जेवण मिळावं आणि सौम्याबद्दल बोलायचं तर ती खूप चांगली सून आहे, जशी प्रत्येकाला हवी असते तशी” ; अशी कमेंट केली आहे.
