Woman Making First Online Payment Viral Video : फर्स्ट आर ऑल्वेज स्पेशल, पहिलं खास असतं असं म्हणतात. मग ती मैत्री असो नोकरी असो किंवा अगदी प्रेम. पहिल्यांदा या सगळ्या गोष्टी आयुष्यात आल्या, या सर्वच गोष्टी पहिल्यांदा केल्यावर त्याचा अनुभव, त्याचे सुख काहीतरी वेगळेच असते, जे शब्दात सांगण्यासारखे नसते. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये आईने पहिल्यांदा युपीआय पेमेंट केल्यावर तिचा आनंद गगनात मावत नाही आहे आणि तिची प्रतिक्रिया व्हायरल होताना दिसते आहे.

आपलं बोटं पकडून जगायला शिकवणाऱ्या आई-बाबांना मॉडर्न काळातील गोष्टी आपण नाही शिकवणार तर कोण शिकवणार. तर आज एका लेकीने तिच्या आईला ऑनलाइन पेमेंट करायला शिकवले. तर आज दूध आणि भाजी विक्रेत्याला तिने नंबर आणि स्कॅनरची मदत घेऊन पैसे दिले. हा आनंद आईच्या गगनात मावत नव्हता. घरी येताच तिने ही कामगिरी अभिमानाने लेकींना सांगितली.

अगदी लहान मुलांसारखी आनंदी झाली (Viral Video)

वाढदिवसाला स्टेटस कसा ठेवायचा, मेसेज, कॉल कसा करायचा अशा छोट्या-गोष्टी कशा करायच्या असे प्रश्न विचारत आई-बाबा आपल्याजवळ येतात. जेव्हा आपल्याकडून हळूहळू शिकवून एकेदिवशी ते स्वतःच या गोष्टी करून दाखवतात तेव्हा येणारी भावना ही जगात वेळी असते. “ज्या महिलेने मला सगळं शिकवलं, आज तिने माझ्याकडून काहीतरी नवीन शिकलं. तिचं पहिलं ऑनलाइन पेमेंट” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. आई आणि लेकीचा सुंदर व्हिडीओ एकदा तुम्हीसुद्धा बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @venus_mathur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी व्हिडीओ पाहून “असं पाहून असं जाणवतं की, स्वावलंबी होण्याचा आनंद खरंच खूप खास आणि अभिमानास्पद असतो. अशा क्षणांमध्ये आपण अगदी लहान मुलांसारखे आनंदी होतो”, “आता पार्सलवर पार्सल येणार”, “माझी आईनेही अगदी अशीच प्रतिक्रिया दिली होती. Paytm स्कॅन करून पेमेंट करताना आणि मग स्वतःच गॅस सिलिंडर बुक करताना तिला खूप भारी वाटले” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…