bottle gourd pakodas shaped like slippers : आई आणि तिचे जुगाड तर अगदी जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यातच भाज्या न खाणाऱ्या मुलांना रोज काहीतरी खाऊ घालणे तिच्यासाठी एक कसरतच आहे. तुम्ही तिने बनवलेल्या एखाद्या पदार्थाला नाही म्हणून तर बघा तिने तिच्या स्वतःच्या पद्धतीने तुम्हाला बनवून खाऊ घातलंच म्हणून समजा. भाजी आवडत नाही म्हणून त्याचेच बनवलेले पराठे असो किंवा रात्री उरलेल्या भाताचा तिच्या स्टाईलने बनवलेला फ्राईड राईस असो; तिच्या नाटकी मुलांसाठी तिच्याकडे अनेक भन्नाट युक्त्या तयार असतात.

सध्या फेसबुक युजर हेतल हिने असाच व्हिडीओ शेअर केला आहे. दुधीची भाजी न खाणाऱ्या मुलांसाठी एक मजेशीर जुगाड दाखवण्यात आला आहे. यात दुधीच्या भाजीचा वापर करून त्याचे लहान, खाण्यायोग्य चपलेच्या आकाराचे पकोडे बनवून मुलांना खायला दिले. जेणेकरून ही भजी खाताना मुलांना अधिक आकर्षक वाटेल.

तिने आधी दुधी भोपळ्याचे तुकडे केले आणि त्यावर चपलेच्या आकाराचा कागदाचा कटआउट ठेवून त्याची बाह्यरेषा (आउटलाइन) आखली. त्यानंतर तिने प्रत्येक तुकडा काळजीपूर्वक चपलेच्या आकारात कापला आणि चपलेचे पट्टे तयार करण्यासाठी टूथपिक्स व दुधी भोपळ्याच्या सालीच्या पट्ट्यांचा वापर केला. भाजीपासून बनवलेल्या या चपला तयार झाल्यावर, तिने बेसन, मसाले आणि पाणी यांचे मिश्रण करून पीठ (बॅटर) तयार केले. तिने दुधी भोपळ्याच्या प्रत्येक ‘चपले’ला या पिठात बुडवले आणि सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. तयार झालेली भजी एका प्लेटमध्ये सजवून केचपसोबत वाढली गेली. यामुळे हा भाजीचा पदार्थ एखाद्या लहान चपलांच्या प्लेटसारखाच दिसत होता.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @Hetal’s Art या या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “सँडलच्या आकाराची दुधी भोपळ्याची भजी” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. ही अनोखी कल्पना पाहून काही युजर्सनी कौतुक केले. तर अनेक जणांनी भजी पाहून ‘चपलेऐवजी दुसरा एखादा आकार बनवता आला असता’ तर दुसऱ्या एका व्यक्तीला ही कल्पना खूप आवडली कारण ‘यामुळे खाण्याच्या बाबतीत नखरे करणारी मुले दुधी भोपळा खाण्यास तयार होऊ शकतात’ आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आलुया आहेत.