Mother Record Voice Note For Daughter Viral Video : आई-बाबा ही आयुष्याला मिळालेली सगळ्यात मोठी देणगी असते. कामावर पोहोचल्यानंतर आणि काम संपल्यावर “सुखरूप पोहोचलीस ना?” किंवा “वेळेत निघालीस ना?” हे विचारण्यासाठी त्यांचा फोन नक्की येतो. त्यांनी केलेला एखादा जरी फोन तुम्ही घाईगडबडीत उचलला नाही की, त्यांचा डोक्यावर विचारांचा डोंगर तयार होतो. मग फोन उचलला नाही म्हणून तुम्हाला ओरडा तर पडतोच पण तुमची विचारपूस तितक्याच काळजीने केली जाते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

लेक शालिनीचे काम, अभ्यासामुळे झोपेचं वेळापत्रक विस्कळीत झाले होते. त्यामुळे नेहमीप्रमाणे रात्री झोपताना तीने फोन ‘सायलेंट’वर ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आल्यावर पाहते तर काय तिच्या आईने भावूक करणारी एक व्हॉइस नोट पाठवली होती, जे ऐकून प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणि डोळ्यांत नक्कीच पाणी येईल. व्हॉइस नोटमध्ये आई तिला प्रेमाने ‘लाडो’ म्हणत तिची आठवण येत असल्याचे म्हणते. बऱ्याच वेळेला फोन केल्यावर आईने लेकीची तक्रार करत फोन सायलेंटवर नको ठेवूस असे देखील आवर्जून सांगते.

त्याचबरोबर मन लावून अभ्यास कर, कोणत्याही गोष्टी मनात दाबून ठेवू नकोस आणि जेव्हा कधी आयुष्य खूप कठीण वाटेल, तेव्हा मित्र-मैत्रिणींना भेट, त्यांच्याशी गप्पा मार असा सल्ला देखील देते. कोणत्याही गोष्टीच टेन्शन नको घेऊस ‘मी तुझ्या बरोबर आहे” असे आपुलकीचे शब्द बोलून वेळेवर खात जा, ज्यामुळे तुझे आरोग्य चांगले राहील अशी काळजी देखील व्यक्त केली. त्याचबरोबर कोणताही मोठा प्रॉब्लेम आला तर आई-वडिलांना नक्की कॉल कर. आय लव्ह असं म्हणत व्हॉइस नोटचा शेवट होतो.

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @slayaniiii या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “माझ्या आयुष्यात आई आहे यासाठी मी काय असं चांगलं केलं असेल, मला खरंच कळत नाही. देवाचे आजही आणि कायम मनापासून आभार” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत. व्हिडीओ पाहून युजर्स “आई सारखं कोणीच नाही”, “Wow हे ऐकून मनाला खूप शांत आणि बरं वाटलं. ही गोष्ट जपून ठेव. कारण प्रत्येकाच्या नशिबात असं प्रेम आणि काळजी मिळणं नसतं”, “माझ्या व्हिडीओमधील मोटिव्हेशनचा भागसुद्धा या ऑडिओ समोर काहीच नाही” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली करताना दिसून आले आहेत…