Viral Video: बघता बघता गणेशोत्सवासाचे दहा दिवस संपले. दोन दिवसांपूर्वीच अनंत चतुर्दशी पार पडली. राज्यात बाप्पाला उत्साहात निरोप देण्यात आला. सोशल मीडियावर बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओंव्यतिरिक्त बाप्पाच्या मूर्तीजवळ फिरत असलेल्या नागांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात बाप्पाच्या मूर्तीजवळ एक उंदीर फिरताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.

बाप्पाच्या मूर्तीजवळ अनेकदा तुम्ही उंदराला फिरताना पाहिले असेल. बाप्पाच्या मूर्तीजवळ ठेवलेले मोदक, मिठाई पळवण्यासाठी उंदीर हजेरी लावतो. इतरवेळी घरात उंदराला पाहिल्यावर लोक त्याला पळवून लावण्यासाठी अनेक प्रयत्न करतात. सध्या एका घरातील एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक उंदीर चक्क मूर्तीमध्ये जाऊन बसल्याचे दिसत आहे.

नक्की काय घडलं या व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक उंदीर बाप्पाच्या मूर्तीच्या डाव्या हाताला पोखरून आतल्या बाजूने बाहेर येण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. उंदराची ही करामत सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. बाप्पाच्या हाताला पोखरलेलं पाहून अनेक जण राग व्यक्त करताना दिसत आहेत, तर अनेक जण बाप्पाचे वाहन असलेल्या उंदराला पाहून जय श्री गणेश म्हणताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @surtilalaaया अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ३० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: “शाळा असावी तर अशी…”, शिक्षकाने गायलं ‘बाप्पा मोरया रे’ गाणं अन् विद्यार्थ्यांनी दिली साथ; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “असे शिक्षक प्रत्येक शाळेत…”

पाहा व्हिडीओ:

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “हा बाप्पाच्या आतमध्ये गेला?” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “असा निष्काळजीपणा मूर्तीबरोबर करू नका”, तर चौथ्या युजरने लिहिलंय की, “बापरे, आता याला बाहेर कसा काढणार?”