मुंबईच्या रस्त्यावर टॉवेल गुंडाळून फिरताना एका तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डिजिटल क्रिएटर आणि मिंत्रा फॅशन सुपरस्टार विजेती तनुमिता घोषचा हीचा मुंबईच्या पवई भागात शुट केलेला व्हिडिओ चर्चेत आला आहे. ती गुलाबी टॉवेल परिधान करून रस्त्यावर चालताना दिसते आहे. घोषने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, ती बस स्टॉपवरून जवळच्या हॉटेलमध्ये चालत असताना आणि एका बेंचवर बसताना लोक तिच्याकडे आश्चर्याने बघत आहे. मुंबईच्या तरुणीचा जुना व्हिडीओ व्हायरल पुढच्या क्षणी जे घडले ते पाहून नेटकऱ्यांना धक्काच बसला. घोषने तिच्यांना गुंडाळलेला टॉवेल काढते आणि नंतर अंगाभोवती गुंडाळेला टॉवेल देखील काढते पण टॉवेलच्या आतमध्ये तिने एक सुंदर निऑन पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसते. पण तिची कृती नेटकऱ्यांना आवडली नाही. हेही वाचा - “जपून जा रे, पुढे धोका आहे!”, धबधब्यावर भिजताना तरुण दगडांवरून घसरला अन् थेट खाली…. Video Viral https://www.instagram.com/reel/C9KWABOSvfH/?utm_source=ig_embed&utm_campaign=loading तिच्या पोस्टमधील व्हिडिओ अलीकडील नसून थ्रोबॅक व्हिडिओ असल्याचे नमूद केले आहे. तिच्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “त्या काळाचा थ्रोबॅक जेव्हा मुंबईचे लोक मला पाहून #TaubaTauba म्हणाले होते!” व्हायरल व्हिडीओचे सत्य या व्हिडिओला इंस्टाग्रामवर १३००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोकांनी तिच्या बोल्ड प्रँकसाठी तिच्यावर टीका केली आहे . आपल्या पोस्टमध्ये तिने हे देखील स्पष्ट केले आहे की, "हा व्हिडिओ २०१९ शो होता जिथे एक विशिष्ट टास्क तिला देण्यात आले होते. कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “मित्रांनो, फक्त माहितीसाठी सांगते हा व्हिडिओ २०१९ मध्ये चित्रित केलेल्या शोचा भाग आहे आणि टास्कचा एक भाग आहे. या शोमध्ये सोनाक्षी सिन्हा, शालीना नाथानी आणि मनीष मल्होत्रा, डिनो मोरिया इत्यादींनी जज केले होते. हे एका एपिसोडमध्ये देण्यात आलेले टास्क होते, त्यामुळे कृपया ते इतके गांभीर्याने घेऊ नका! धन्यवाद,” हेही वाचा - आयुष्याबरोबर खेळू नका! जोरात समुद्राची लाट आली अन् चिमुकलीसह आई…थरारक Video पाहून सांगा चूक कोणाची? व्हायरल व्हिडिओवर कमेंट्स एका यूजरने लिहिले, “उर्फी जावेदची छोटी बहिण” दुसऱ्या वापरकर्त्याने तिचे कौतुक केले आणि म्हटले, “मला आठवते की या एपिसोडनंतर तू माझी आवडती स्पर्धक होतीस.. मिंत्रा फॅशन स्टार सीझन पहिलाआहे. तू जॅकेट ज्या पद्धतीने स्टाईल करता, मला ते खूप आवडले, तो माझा आवडता सिझन होता” एका युजरने कमेंट केली, “दीदी हे हॉलीवूडचे प्रँक्स येथे चालणार नाही"