संगीतकारांनी आपापल्या बाल्कनीतूचं भरवला कॉन्सर्ट; व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

viral video of musice
हा व्हिडीओ न्यूयॉर्कमधला आहे (फोटो:@connellthompsonsax/Instagram)

आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात काहीही व्हायरल होतं असत. कधी खूप भावनिक तर कधी खूप विनोदी व्हिडीओ असतात. असाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडीयावर व्हायरल झाला आहे. यात संगीतकारांना आपापल्या बाल्कनीतून संगीत सादर करण्यासाठी एकत्र येत असल्याचे दर्शवते.हा व्हिडीओ संगीतकार कॉनेल थॉम्पसन यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी लिहिले की लाईव्ह शो गेल्या वर्षी अमेरिकेत झालेल्या अत्यावश्यक कामगारांसाठी होता. त्यांनी असेही लिहले की “इडा या चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्यांसाठी विशेष कामगिरी हा निधी उभारणारा शो होता.”

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ, पोस्ट केल्यापासून १,६०० हून अधिक लोकांनी बघितला आहे आणि अनेकांनी कमेंट्सही केल्या आहे. व्हिडीओने लोकांना वेगवेगळ्या कौतुकास्पद कमेंट्स पोस्ट करण्यास प्रवृत्त केले आहे.“हे छान आहे,” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “पूर्ण नवीन व्हर्जन आहे” दुसऱ्याने शेअर केले. “पूर्णपणे अविश्वसनीय,” तिसऱ्याने टिप्पणी दिली.

पहा व्हिडीओ

व्हिडीओबद्दल तुमचे काय मत आहे?

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video musicians in new york come together to perform from their balconies ttg