अयोध्येमध्ये २२ जानेवारी रोजी प्राण-प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. देशभरातील सर्वांनाच राम मंदिराच्या उद्घाटनांची उत्सुकता आहे. येत्या सोमवारी प्रभु रामाच्या मुर्तीची प्राण-प्रतिष्ठा केली जाणार आहे. त्यानिमित्त देशभरातील विविध ठिकाणी भाविक रोज पुजा, भजन किर्तन करून आनंद साजरा केला जात आहे. काही लोक राम भजन गाऊन आंनद व्यक्त करत आहे तर काही लोक नृत्य करून आनंद व्यक्त करत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांसह ‘राम आएंगे’ गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडिओ इंस्टाग्रामवर वापरकर्ता काजल असुदानी(kajalasudanii) नावाच्या अकांउटवर शेअर केला गेला आहे. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. विद्यार्थी आणि शिक्षिकेचे नृत्य पाहून लोक मंत्रमुग्ध झाले आहेत.

व्हिडिओ व्हायरल होत आहे
हिरवी साडी परिधान केलेली, शिक्षिका काजल विद्यार्थ्यांच्या समोर उभी आहे.’राम आएंगे’ या गाण्यावर नाचताना दिसते. विद्यार्थी शिक्षिकेचे अनुकरण करत नृत्य करतात. मुले आणि मुली सर्व विद्यार्थी शिक्षिकेने शिकवल्याप्रमाणे नाचताना दिसत आहे.

हेही वाचा – “प्रत्येक पाकिस्तानी क्रिकेटपटूचा आवडता विषय म्हणजे…”, सानिया मिर्झाचा टीव्ही शोमधील ‘तो’ VIDEO व्हायरल

लोकांनी प्रतिक्रिया दिल्या
या क्लिपला इंस्टाग्रामवर ४५०० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत आणि अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एकाने सांगितले की, “मॅडम आणि मुलांचे कौतुक करावे लागेल. ही भक्ती पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले.” विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या व्हिडीओवर अनेकांनी ‘जय श्री राम’ लिहिले.

हेही वाचा – पुण्यात एकाच रिक्त जागेसाठी लागली हजारो लोकांची रांग; नोकरीसाठी धरपडणाऱ्या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल

राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
२२ जानेवारीला अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळ्याचे विधी करणार आहेत. लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली पुजाऱ्यांचे पथक मुख्य विधीचे नेतृत्व करणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video nagpur teacher dances to tunes of ram aayenge internet cant stop loving it snk
First published on: 21-01-2024 at 13:25 IST