भारतात अनेक सुंदर सुंदर पर्यटन स्थळे आहेत. येथे प्रत्येक दिवशी शेकडो पर्यटक येतात आणि या सुंदर ठिकाणांचा आस्वाद घेतात. परंतु अशावेळी ही ठिकाणे स्वच्छ ठेवणे, त्यांचे पावित्र्य अबाधित ठेवणे हे प्रत्येक पर्यटकाचे कर्तव्यच असते. मात्र अनेकदा पर्यटक या गोष्टी विसरतात आणि बेजबाबदार वर्तणूक करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये ३ व्यक्ती प्राचीन पँगॉन्ग तलावात त्यांची कार चालवताना दिसत आहेत.

जिग्मत लडाखी नावाच्या ट्विटर यूजरने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये या प्राचीन तलावात एक व्यक्ती एसयूव्ही चालवताना दिसत आहे, तर दोन व्यक्ती सनरूफमध्ये उभे आहेत. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये फोल्ड करण्यायोग्य खुर्ची आणि टेबलही दिसत आहे, ज्यावर दारूच्या अनेक बाटल्या, पाणी आणि चिप्सची पाकिटे विखुरलेली दिसत आहेत.

‘कच्चा बादाम’ नंतर सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ‘बाकी नींबू बाद विच पाऊंगा’; लिंबूपाणी विकण्याची ही स्टाइल पाहून हैराण व्हाल

व्हिडीओ शेअर करताना जिग्मत लडाखीने लिहिले की, ‘मी पुन्हा एकदा आणखी एक लाजिरवाणा व्हिडीओ शेअर करत आहे. असे बेजबाबदार पर्यटक लडाखचा नाश करत आहेत. तुम्हाला माहीत आहे का? लडाखमध्ये पक्ष्यांच्या ३५० हून अधिक प्रजाती आहेत आणि पॅंगॉन्गसारख्या तलावांमध्येही अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. अशा कृत्यांमुळे या प्रजातींच्या अधिवासाला धोका निर्माण होऊ शकतो.’

व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना चांगलाच राग आला असून त्यांनी तलावात पर्यटकांनी गाडी चालवल्याबद्दलही संताप व्यक्त केला. या व्हिडीओवर अनेकांनी कंमेंट लिहून संबंधित अधिकाऱ्यांना टॅग करत या ३ पर्यटकांवर कारवाईची मागणी केली. व्हिडीओमधील वाहनाचा नोंदणी क्रमांक गुरुग्रामचा आहे. एका यूजरने लिहिले की, ‘राज्यमंत्र्यांनी या बदमाशांवर कठोर कारवाई करावी. त्यांना शिक्षा करा आणि समज द्या, जेणेकरुन इतर पर्यटक अशी कृत्ये परत करणार नाहीत. अशा लोकांना या ठिकाणी भेट देण्यास बंदी घातली पाहिजे!’

Viral Video : वेगात आलेली BMW आदळली रस्ता क्राॅस करणाऱ्या महिलेला; पुढे जे झाले ते पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स

दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘लडाखमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक कारची अल्कोहोल तपासली पाहिजे. आणि ज्या वाहनांमध्ये दारू सापडेल त्यांना परत जाण्यास सांगा. तसेच, राज्यात येण्यासाठी फक्त स्थानिक पर्यटक वाहने वापरावीत. अशा घटना रोखण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नाही.’