Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर आणि चौपाटीवर शॉर्ट्स आणि बिकिनी घातलेले पर्यटक पाहणे हे काही भारतीयांसाठी सुद्धा आता नवीन नाही. उलट आता या ठिकाणी कोणी साडी नेसून आलं तर त्याच व्यक्तीकडे काहीतरी गुन्हा केला आहे असं आजूबाजूची मंडळी बघत बसतात. एकूणच अशी ही उलटी गंगा आता भारतात सुद्धा वाहायला लागली आहे. असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. यामध्ये बिकिनी घालूनफिरणाऱ्या सुंदर ललनांमध्ये एक भारतीय स्त्री चक्क साडी नेसून, डोक्यावर पदर घेऊन फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे दृश्य भारतातील नसून आजूबाजूच्या परिसरावरून तरी परदेशातील वाटत आहे.
थेट परदेशात जाऊन त्यांच्याच चौपाटीवर या साडी नेसलेल्या महिलेने सगळ्यांना भुरळ पाडली आहे. ही क्लिप ऋषिका गुर्जरने 22 ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर पोस्ट केली होती. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, भारतीय महिला एका समुद्रकिनाऱ्यावर बिकिनी घातलेल्या तरुणींमध्ये भारतीय पारंपारिक पोशाखात हसत चालताना दिसली. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी “अहो काकू तुम्ही इथे कुठे पोहचलात” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
व्हिडिओला १ लाख २० हजार व्ह्यूज मिळाले आहेत.या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करत या महिलेचे कौतुकही केले आहे. आपली संस्कृती धरून राहण्यासाठी अनेकांनी तिचे अभिनंदन केल्याचे कमेंट बॉक्समध्ये पाहायाला मिळते. एकाने लिहिले, “भारतीय संस्कृती आणि पाश्चिमात्य यातील फरक, आम्हाला आमच्या संस्कृतीचा अभिमान वाटला पाहिजे”. दुसर्याने लिहिले, “साडीतील स्त्री सर्वात सुंदर आहे!”