viral video non maharastrian bride & maharashtrian groom : लग्न सोहळ्यात, एखाद्या सणाला अगदी पूजेला बसल्यावर जोडप्यांकडून उखाणे घेण्याची परंपरा आजही जपली जात आहे. त्यातच महाराष्ट्रीयन लग्नपद्धतीत उखाण्यांना फार महत्त्व दिले जाते. लग्नाचं घर म्हटलं की, प्रत्येक कार्यक्रमात कायम एक आग्रह केला जातो आणि तो म्हणजे ‘उखाणा’ घ्या. उखाण्यात आपल्या जोडीदाराचे नाव घ्यावे लागते. ही एक फार जुनी आणि मनोरंजक प्रथा आहे. नुकत्याच पार पडलेल्या एक विवाह सोहळ्यातही व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतो आहे. पण, यामध्ये नवऱ्याने पैज लावल्यावर, बायकोने उखाणा घेऊन ती पैज जिंकली आहे.

व्हायरल व्हिडीओत नवरा बायकोला म्हणतो “जर तू मराठीत उखाणा घेतलास तर मी १२ हजार रुपये देणार”. नवऱ्याची ही मागणी अथवा मस्करीत लावलेली पैज ऐकून एकच गोंधळ उडतो. नवरीकडची मंडळी महाराष्ट्रीयन नसल्यामुळे उखाणा म्हणजे काय असे नवऱ्याकडच्या मंडळींना विचारताना दिसत आहेत. पण, नवरी मात्र हुशार असते तिने आधीच तयारी करून ठेवलेली असते. तिने मोबाईलमध्ये काही मराठी उखाणे आधीच सेव्ह करून ठेवलेले असतात. नवऱ्याची पैज स्विकारुन ती उखाणा मराठीत घ्यायला तयार होते.

“वाहिनी जोरात, भाऊ कोमात” (Viral Video)

तर नवरीने “लव्ह मॅरेजला अरेंज मॅरेज करण्यासाठी घेतले खूप कष्ट, मनीष रावांचे नाव घेते सगळ्यांसमोर स्पष्ट” हे ऐकताच नवरीकडची मंडळी जोरजोरात ओरडायला लागतात तर नवऱ्याकडची मंडळी मराठीत घेतलेला उखाणा ऐकून प्रचंड खुश होतात. महाराष्ट्रीयन नसल्यामुळे उखाण्यातील कष्ट आणि स्पष्ट या शब्दांचा उच्चार तर अगदी ऐकण्याजोगा आहे. तुम्ही सुद्धा ऐका नॉन महाराष्ट्रीय नवरीचा मराठीतून घेतलेला भन्नाट उखाणा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @15_pallavi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “जेव्हा तुमच्या होणाऱ्या नवऱ्याला तुम्हाला मराठी ये नाही हे माहिती असतं” ; अशी कॅप्शन देण्यात आली आहे. नेटकरी देखील व्हिडीओ पाहून “१२ हजार गेले पण भावाने मराठी बोलूनच घेतलं”, “तिने मराठीत उखाणा घेताना जे प्रयत्न केले आहेत, त्यासाठी एक्स्ट्रा पैसे दिले पाहिजेत”, “वा लय भारी वहिनी”, “वाहिनी ऑन फायर”, “१२ हजार गेले”, “क्युट मराठी”, “वाहिनी जोरात, भाऊ कोमात”; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…