Viral Video of 3 years old child saved his grandmother from an accident: आजी आणि नातवाचं नातं हे अनोखं असतं असं म्हणतात. आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबा आपल्या नातवंडांच्या जास्त जवळं असतात. अगदी हक्काने, लाडाने किंवा हट्टाने नातवंड आपल्या आजी-आजोबांना अनेक गोष्टी करायला लावतात आणि नातवंडाच्या आनंदापुढे आजी-आजोबा ते करतात.

न बोलता उमगणाऱ्या या नात्याबद्दल आपण अनेकदा वाचत ऐकत असतो. आजकाल या नात्याचे असे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर अनेकदा व्हायरल होत असतात. पण आता सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय जो बघून तुम्हाला धक्का बसेल.

हेही वाचा… चालत्या ट्रकमध्ये मारली उडी अन्…, अपघात टाळण्यासाठी महिलेने केलं ‘असं’ काही की…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

तुम्ही कधी एका ३ वर्षीय मुलाने त्याच्या आजीचा अपघात होण्यापासून वाचवल्याचं तुम्ही पाहिलंय का? नाही ना… तर हा व्हायरल झालेला व्हिडीओ एकदा पाहाच.

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, एक महिला शिडीवर चढून काहीतरी काम करताना दिसतेय. तितक्यात ती शिडी खाली पडते आणि महिला वरील खांबाच्या सहाय्याने वर लटकून राहते. तेवढ्यात तिथे असलेला तिचा ३ वर्षीय नातू आजीला अशा अवस्थेत पाहून धावत-पळत येतो आणि आपली संपूर्ण ताकद लावून ती शिडी उचलतो. शिडीच्या साहाय्याने आजी खाली उतरते आणि नातवाला बिलगते.

हा व्हायरल व्हिडीओ sachkadwahai या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. लहान पण पराक्रमी! “एका ३ वर्षाच्या मुलाने हे सिद्ध केले की मोठा प्रभाव पाडण्यासाठी तुम्ही कधीही लहान नसता. त्याने आपल्या आजीला गरजेच्या क्षणी वाचवले, शूर आणि निस्वार्थी असणे म्हणजे काय हे आम्हा सर्वांना दाखवून दिले.”

हेही वाचा… बापरे! रेल्वे अपघात घडवण्यासाठी तरुणाचं धक्कादायक कृत्य; रुळांवर ठेवलं असं काही की… VIDEO पाहून भरेल धडकी

युजर्सच्या प्रतिक्रिया

आजी-नातवाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एकाने कमेंट करत लिहिलं, “आजी खाली उतरेपर्यंत तो शिडीच्या टोकाशी सुरक्षाकवचासारखा उभा राहिला.” तर दुसर्‍याने कमेंट करत लिहिलं, येथे २ उत्तम गोष्टी आपल्याला शिकायल्या मिळाल्या त्या म्हणजे आजी अजूनही या वयात ती अशा प्रकारच्या गोष्टी करू शकते आणि दुसरं, इतरांना वाचवण्यासाठी लहान मुलगा काय करू शकतो याची त्याला चांगलीच समज आहे.” तर अनेकांनी इमोजी शेअर करत चिमुकल्याच्या शौर्याचे कौतुक केले.