scorecardresearch

Premium

Viral Video : बुरखा घालून गर्लफ्रेण्डला भेटायला गेला अन्… पुढे काय झालं, पाहा व्हिडीओ

गर्लफ्रेंडला भेटायला चक्क बुरखा घालून आला होता तरुण मात्र पुढे जे झाले ते वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

viral video of a boy went to meet girlfriend by wearing burqa
(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा बुरखा घातलेला दिसत आहे. हा मुलगा चक्क गर्लफ्रेण्डला भेटायला बुरखा घालून आला होता, मात्र पुढे याच्यासोबत जे झाले ते वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

कानपूरच्या घाटमपूर येथे एक तरुण बुरखा घालून फिरत होता. लोकांना त्याची वागणूक संशयास्पद वाटली, त्यामुळे त्याला चोर समजून थेट पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र जेव्हा पोलिसांनी त्याची विचारपूस केली तेव्हा या तरुणाने आपण चोर नसल्याचे सांगितले. गर्लफ्रेण्डला भेटण्यासाठी बुरखा घातला होता, असेही तो म्हणाला.

asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
ajit pawar
‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
Old Malavani Aaji Writes Letter To Son After Ganpati Visit How Konkan Gets Lonely International Day Of Older Person Emotional
गणपतीला आलेला लेक, सून, नात मुंबईत निघून गेले, आणि मी पुन्हा वेडीच ठरले!
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…

हेही वाचा : Viral Video : भर लग्नात नवरदेवाच्या समोर नवरीने गुटखा खाल्ला अन्…

या तरुणाचे नाव अन्सार खान असून तो औरेया येथील रहिवासी आहे. गर्लफ्रेण्डला भेटण्यासाठी तो कानपूरला आला होता. या ठिकाणी त्याच्या चुलत भावाचे सासर आहे, त्यामुळे आपल्याला कोणी ओळखू नये म्हणून त्याने बुरखा घातल्याचे पोलिसांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा : चिमुकली उचलते चक्क ६० किलोचं वजन, नेटकरी म्हणतात, “ही तर दुसरी मीराबाई चानू”

सध्या सोशल मीडियावर हे प्रकरण चांगलचं चर्चेत आहे. व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. याआधीही गर्लफ्रेण्डला भेटण्यासाठी तडजोड करणाऱ्या तरुणांचे असे बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of a boy went to meet girlfriend by wearing burqa kanpur people caught him ndj

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×