गेल्या आठवड्यात अगदी धुमधड्याक्यात दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. घरोघरी चविष्ट फराळ बनवले गेले तर दारोदारी कंदीलने रोषणाई केली गेली. गेला आठवडाभर दिवाळीचा उत्साह देशभर पाहायला मिळाला. फराळापासून सुरू झालेला दिवस, रात्री फटाके फोडण्यावर येऊन संपतो. अगदी लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच फटाके फोडण्याचा आनंद लुटतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अनेक जण फटाके फोडताना दरवर्षीच नवनवीन स्टंट करत असतात. हे स्टंट कधीकधी त्यांच्याच अंगलट येतात. कधी हातात घेऊन फटाका फोडणं, तर कधी कोणत्यातरी भांड्यात फटाका लावणं असे स्टंट सुरूच असतात. पण, यामुळे अनेकदा अपघात होतो आणि लोकं जखमी होतात, तर काहींच्या जीवाला धोकादेखील निर्माण होतो. परंतु, तरीही मजा मस्ती म्हणून काही जण अशी स्टंटबाजी दरवर्षी करतच असतात आणि याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना देखील आपण पाहतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक मित्र त्याच्याच मित्राच्या तोंडात सुतळी बॉम्ब फोडतो.
हेही वाचा… रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; वर्गात बेंचवर चढली अन् तरुणीबरोबर असं काही झालं की…, पाहा VIDEO
व्हायरल व्हिडीओ
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दोन मित्र सुतळी बॉम्ब वाजवण्याच्या तयारीत दिसत आहेत. या व्हिडीओत एकाने हातात सुतळी बॉम्ब घेऊन दुसरा तो पेटवताना दिसतोय. सुतळी बॉम्ब पेटवल्यानंतर हा मित्र चक्क समोरच्या मित्राच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवतो. फटाक तोंडात ठेवल्यावर त्या मित्राला धक्काच बसतो.
हा व्हायरल झालेला व्हिडीओ @khatam_bhaiiiii_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “दिवाळी पे दिवाला” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. तसचं या व्हिडीओला तब्बल ४३.२ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “एका व्हिडिओसाठी त्याने स्वत:चा बळी दिला” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “फक्त काही लाईक्ससाठी हे करू नका.” तर तिसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “खूप खतरनाक लोक आहेत.”
दरम्यान, फटाक्यांबरोबर मस्ती करताना याआधी अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे किंवा भयंकर दुखापत झाली आहे.