Viral Video : आपल्या देशात सर्वात जास्त लोक ट्रेननी प्रवास करतात. सरकार रेल्वेच्या माध्यमातून प्रवाशांना नवनवीन सुविधा देत असतात पण अनेकदा अशा घटना समोर येतात की लोकं संताप व्यक्त करतात. सोशल मीडियावर रेल्वेतील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक उंदीर एसी कोचमध्ये फिरत असल्याचे फिरत आहे. भुवनेश्वर जुनागड एक्स्प्रेसच्या एसी डब्यात प्रवास करणाऱ्या एका महिलेने हा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओ पाहून कोणीही संताप व्यक्त करेन.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक उंदीर रेल्वेच्या एसी कोचमध्ये फिरताना दिसत आहे.एका महिलेने उंदीर फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. जस्मिता पाटी असे या महिलेचे नाव आहे. Jasmita Pati या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “या रेल्वे प्रवासादरम्यान उंदीर इकडे तिकडे वागणार आणि स्वच्छता पाहून भयानक अवस्था पाहून मला धक्का बसला.यावर त्वरीत पाऊल उचलण्याची गरज आहे.” या पोस्टमध्ये या महिलेने रेल्वे मंत्रालय, मध्ये रेल्वे आणि रेल्वे सेवेच्या अधिकृत अकाउंटला टॅग केले आहे.

indian railways irctc passanger shares pic of food containing insects in gorakhpur mumbai kashi express post went viral
रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा! काशी एक्स्प्रेमध्ये जेवणात आढळला किडा; IRCTC च्या उत्तरावर नेटकऱ्यांचा संताप
When Indian young woman wears saree and takes over streets of Japan
Video : जेव्हा भारतीय तरुणी जपानच्या रस्त्यावर साडी नेसून फिरते, तेव्हा.. पाहा व्हायरल व्हिडीओ
KKR Seo on Rohit Sharma Abhishek Nayar Viral Video
IPL 2024: रोहित शर्मा-अभिषेक नायर ‘त्या’ व्हायरल व्हीडिओमध्ये नेमकं काय बोलत होते? KKR च्या सीईओने केला खुलासा
Who exactly is Archit Grover of Indian origin
कॅनडात सोन्याची आजवरची सर्वात मोठी फ्लिमी स्टाइल चोरी; अटकेतील भारतीय वंशाचा अर्चित ग्रोव्हर नेमका कोण?
Bengaluru metro video
Viral Video : बंगळुरू मेट्रोमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे, पोलिसांनी घेतली दखल; म्हणाले…
canada student visa (1)
कॅनडाच्या ‘त्या’ निर्णयाने भारतीय विद्यार्थी अडचणीत, स्टडी व्हिसाऐवजी व्हिजिटर व्हिसावर कॅनडाला जाण्याच्या प्रयत्नात; कारण काय?
mohammad nabi run out kagiso rabada ishan kishan wicketkeeping win mumbai indians match vs pbks ipl 2024 aggressive celebration rohit sharma haridik pandya and all mi team
VIDEO : नबी-किशनच्या ‘हुशारी’समोर आशुतोष-शशांकची मेहनत वाया; शेवटच्या ओव्हरमध्ये बाजी पालटली आणि जे घडलं…
Bikini-clad woman rides crowded Delhi bus
बसमध्ये बिकिनी घालून प्रवास करणाऱ्या महिलेला पाहून ओशाळले प्रवासी; व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : Ellyse Perry Video : काळी साडी अन् कानात झुमके; एलिस पेरीचा झकास डान्स पाहून चाहते घायाळ, व्हिडीओ व्हायरल

महिलेच्या या व्हिडीओवर रेल्वे सेवाच्या अधिकृत अकाउंटवरून प्रतिक्रिया आली आहे. रेल्वे सेवाने आवश्यक कारवाईसाठी विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना टॅग केले आहे. महिलेने तिचा पीएनआर नंबर, नाव, क्लास आणि सविस्तर माहिती सांगितली आहे. त्यानंतर रेल्वे सेवाने या महिलेची तक्रार नोंदवली असल्याचे सांगितले आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. यापूर्वीही रेल्वेचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. काही दिवसांपूर्वी काही प्रवाशांना चक्क रेल्वेच्या शौचालयात उभं राहून प्रवास करावा लागला होता. व्हायरल व्हिडीओत रेल्वेच्या खिडकीजवळ एक व्यक्ती उभी होती आणि खिडकीतून आतमध्ये शौचालयात या व्यक्तीसह अन्य लोकं सुद्धा सामानाबरोबर बसलेली किंवा उभे असलेली दिसली होती. लखनऊच्या चारबाग रेल्वे स्टेशनवरील ही घटना चर्चेचा विषय ठरली होती.