सोशल मीडिया म्हटलं की, तिथे अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. एखादा विषय, व्हिडीओ, फोटो व्हायरल होऊ लागल्यानंतर मग तो ट्रेंड होतो. पण सध्या एका हिमबिबट्याचा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल. कारण या व्हिडीओत शिकार करणारा बिबट्या मेंढीसहित तब्बल ३०० फूट खाली कोसळताना दिसत आहे.

व्हिडीओमध्ये बिबटया मेंढीचा पाठलाग करताना दिसत आहे. मेढींला पकडल्यानंतर दोघेही कड्यावरुन खाली कोसळतात आणि ३०० फूटांपर्यंत फरफटत जातात. महत्त्वाचं म्हणजे, खाली कोसळत असतानाही मेंढी संघर्ष करताना दिसत आहे. पण मादी बिबट्या मेंढीला आपल्या जबड्यातून सुटू देत नाही.

पार्सल ट्रक पाहून बेशुद्ध होण्याचे नाटक करणाऱ्या शेळ्यांचा हा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

४२ सेकंदांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ The Secret Lives of Snow Leopard या माहितीपटातील आहे.

हा व्हिडीओ नेटकऱ्यांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे. निसर्गात दडलेल्या अदभुत गोष्टींचीही यानिमित्ताने चर्चा होत आहे.