Viral video of a woman slipping from a gas cylinder: सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात रील्स, डान्स, अभिनयाचं प्रमाण जास्त आहे. या असंख्य व्हिडीओंमध्ये असे काही व्हिडीओ असतात, जे कायम लक्षात राहतात.

आजकाल प्रसिद्धीसाठी लोक काहीही करायला तयार असतात. लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी हल्ली लोक जीवावर बेतेल असे स्टंट करताना दिसतात. त्यात काही जण आपला जीव गमावतात; तर काही जण गंभीर होतात. आजूबाजूला अशा घटना घडत असूनही स्वत:ला सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर म्हणवणाऱ्या लोकांची अशी कृत्यं अजूनही सुरूच आहेत. अशाच घटनेचा काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. या व्हिडीओत एक महिला गॅस सिलिंडरवर आपलं नृत्यकौशल्य दाखविताना दिसत आहे.

हेही वाचा… हिच्यापुढे तृप्ती डिमरी पण फेल; विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर महिलेचा भन्नाट डान्स, VIRAL VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “बसं कर, तू…”

व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत एक महिला गॅस सिलिंडरवर डान्स करताना दिसतेय. पंजाबी ड्रेस परिधान करून ही महिला या सिलिंडरवर नृत्य सादर करताना दिसतेय. पण, डान्स करता करता अचानक तिचा तोल जातो आणि ती खाली पडते. जोरदारपणे खाली पडल्यानं तिला लागलेलं दिसतंय. या महिलेनं अनेकदा असे स्टंट करणारे डान्स व्हिडीओ केले आहेत.

हा व्हिडीओ ‘sehnaj_badgujar’ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कमी वेळातच एक लाखापेक्षा अधिक व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; विद्यापीठात दोघांनी केलं किस अन्…, VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त

युजर्सच्या कमेंट्स

व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी त्यावर भरभरून कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “सिलेंडर तोड डान्स.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “मला वाटलंच होतं की ती पडेल.” एक जण म्हणाला, “अजून करा डान्स; मग असंच होणार.”

हेही वाचा… माणुसकीचा अंत! दुचाकीस्वाराच्या चाकाखाली चिरडलं श्वानाचं पिल्लू; धक्कादायक VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका

दरम्यान, याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. व्हिडीओच्या नादात अनेक जण असे स्टंट करायला जातात आणि स्वत:चा जीव धोक्यात घालतात.