सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, त्यातील काही व्हिडीओ असे असतात जे पाहिल्यानंतर अनेकांच्या अंगावर शहारा येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक महिला जंगली प्राण्यांच्या कळपातून एकटी आणि तेही रात्रीची जाताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवरती विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.
व्हायरल व्हिडीओमधील महिलेच्या एका हातात पाण्याचा कॅन आणि डोक्यावर लाकडांची मोळी दिसत आहे. खरं तर आजही अनेक गावं, वस्त्या अशा आहेत, जिथे पाण्याची खूप कमतरता आहे. तेथील लोकांना पाण्यासाठी रोज जीवघेणा संघर्ष करावा लागतो. त्यामध्ये कोणाला कित्येक किलोमीटर चालावं लागतं कोणाला खोल विहिरीतून पाणी काढावं लागतं. याबाबतच्या अनेक बातम्या आपण सोशल मीडियावर पाहत आणि वाचच असतो.
हेही पाहा- दारात आला महाकाय अजगर अन् तितक्यात…थरारक Video पाहून येईल अंगावर काटा
व्हायरल व्हिडिओमध्ये अशीच एक महिला जंगलातून पाणी आणताना दिसत आहे. मात्र, ती पाणी घेऊन येत असताना तिच्याभोवती शेकडो तरस उभे असल्याचं दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ही महिल तरसांना न घाबरता बिनधास्तपण चालत पुढे जाताना दिसत आहे. तरसही त्या महिलेला जाताना पाहतात मात्र, तिच्यावर हल्ला करण्याचं धाडस करत नाहीत. जे पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
महिलेच्या धाडसाचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक –
हेही वाचा- ऑफिसच्या कामाचे तब्बल ३५५ तास त्याने सिगारेट पिण्यात घालवले; बॉसला कळताच अशी घडवली अद्दल
@OnlyBangersEth नावाच्या ट्विटर अकाऊंटवरुन या महिलेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये अनेक तरस रस्त्यावर उभे असल्याचं दिसत आहे. तर त्या तरसांच्याममधून एक महिला डोक्यावर लाकडांची मोळी आणि हातात पाण्याचा कॅन घेऊन जाताना दिसत आहे. सध्या या महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून आतापर्यंत तो एक लाख ४२ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. नेटकरी व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलं आहे की, ही महिला खतरों की खिलाडी आहे, जी या भयंकर प्राण्यांमधून न घाबरता जात आहे. तर अनेकजण या महिलेच्या धाडसाचं कौतुक करताना दिसत आहेत.