लहान मुलं असो वा वृद्ध सर्वांनाच जत्रेला भेट द्यायला आवडते. कारण जत्रेत प्रत्येकासाठी काही ना काही आवडीच्या गोष्टी असतात. ज्याचा अनेक जण मनमुराद आनंद लुटतात. लहान मुलांना अनेक मनोरंजनाच्या गोष्टी उदा. विविध आकाराचे झुले, खेळणी आणि खाण्याचे पदार्थ असतात. त्याचप्रमाणे मोठ्यांना मोठे झुले आणि खाण्याचे चमचमीत पदार्थ पाहायला मिळतात. त्यामुळे जत्रेत फिरण्याची एक वेगळी मज्जा अनुभवता येते. जत्रेशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात, ज्यातील अनेक व्हिडीओ युजर्सना खूप आवडतात. नुकताच जत्रेतील एक व्हिडीओ लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामागचे कारण म्हणजे, जत्रेत हातात पोस्टर धरून उभा असलेला तरुण. जाणारे-येणारे तरुण पोस्टरवर लिहिला मजकूर वाचून वेगवेगळ्या रिॲक्शन देत आहे. या व्हिडीओमधील तरुणाने पोस्टरवर लिहिलेला मजकूर वाचून तुम्हीही म्हणाल की, त्या व्यक्तीने जे काही केले, ते योग्य केले.

अनेकदा पैसे घेतल्यावर लोक ते विसरतात. असे बरेच लोक असतील जे दुसऱ्याला दिलेले त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी खूप धडपड करतात, अनेकदा ते मिळतात पण काही वेळा ते मिळतही नाहीत. या पैशांच्या व्यवहारामुळे अनेकांची मैत्री आणि नाती तुटल्याचे अनेक वेळा पाहायला मिळते.
लोक दुसऱ्यांकडून पैसे उधार घेतात, पण ते परत करताना हजारो सबबी देतात. याचविषयावर लक्ष केंद्रित करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो अनेकांच्या हृदयाला भिडणारा आहे.

Man Stabbed to Death for Confronting Women Smoking in Public Three Arrested
नागपूर : सिगारेट ओढणाऱ्या तरुणींना हटकणे युवकांचे जीवावर बेतले
18 month old baby head stuck in vessel viral video
पातेल्यात अडकले चिमुकल्या बाळाचे डोके!अग्निशमन कर्मचाऱ्यांनी कसे वाचवले त्याचे प्राण, पाहा हा Video…
Noida women in viral Holi video
होळीच्या नावावर मेट्रो अन् चालत्या स्कुटीवर अश्लील स्टंट करणाऱ्या कोण आहेत विनीता आणि प्रीती? पोलिसांनी केली अटक
viral heena makeup video
मेहंदी हाताऐवजी लावली ओठ अन् डोळ्यांवर! व्हायरल मेकअप ट्रेंडवर नेटकऱ्यांनी उडविली खिल्ली…

व्हिडीओमध्ये पाहू शकता की, एक तरुण भर जत्रेत हातात एक पोस्टर घेऊन उभा आहे, ते पोस्टर जत्रेत जाणारा-येणारा प्रत्येक जण काळजीपूर्वक वाचत आहे. काहींना पोस्टरवरील गोष्ट एकदम पटली आहे, तर काही पोस्टरवर लिहिलेला मजकूर वाचून हसत आहेत. त्याच वेळी काही जण लाजेने मान खाली घालत आहेत.

तरुणाच्या हातातील पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ‘फालतू खर्च करण्यापूर्वी ज्यांनी तुम्हाला एक चांगला माणूस म्हणून पैसे उधार दिले आहेत त्यांचे पैसे परत करा. ७ दिवसांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ २ लाख ३४ हजारांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे, तर ३ हजारांहून अधिक युजर्सनी यावर वेगवेगळ्या कमेंट्स दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘ही खरी बाब आहे.’

हा व्हिडीओ vikalp_malvi_78_ या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्याला खूप पसंती दिली जात आहे. व्हिडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीने याआधीही अनेक समान प्रकारच्या व्हिडिओ शेअर केले आहेत.

या तरुणाने यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत, ज्यावर युजर्सकडून वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत. हे व्हायरल व्हिडीओ बघितले जात आहेत आणि खूप लाइक केले जात आहेत.