Viral Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. त्यात डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. अगदी लहानग्यांपासून ते वयोवृद्धापर्यंतची मंडळी सोशल मीडियावर थिरकताना दिसतात. प्रसिद्धीसाठी तर स्वत:च्या आनंदासाठी अनेक लोक मेट्रोत, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, तर कधी रस्त्यांवर डान्स करताना आपल्याला दिसतात.
गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर ‘झटपट पटापट’ ‘नैनै लढावा’, ‘मला आवडस तुच एक हिरो’ अशी गाणी खूप चर्चेत आली आहेत. त्यावर लाखो लोकांनी रील्स बनवलेल्या पाहायला मिळत आहेत. पण, याचसोबत सध्या अजून एक गाणं खूप ट्रेंडिंग होतंय, ते म्हणजे क्रांतीज्योती विद्यालय या चित्रपटातील ‘सहलीला जायाचं’.
‘सहलीला जायाचं’ हे गाण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग होतंय. या गाण्यावर अनेक इन्फ्ल्यूएन्सर्ससह कलाकारदेखील थिरकताना दिसतायत. अशातच सध्या सहलीला जाताना काही महिला या गाण्यावर थिरकल्या आहेत.
सहलीला जायाचं गाण्यावर आजींचा डान्स (Sahlila Jayacha Dance Video)
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, अनेक महिला बसमधून सहलीला जाण्यासाठी निघाल्या आहेत. याच आनंदात त्यांनी सहलीला जायाचं या गाण्यावर डान्स केला आहे. या व्हिडीओत आजींनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सहलीचा उत्साह की काय म्हणून अगदी जोशात डान्स करताना या महिला दिसतायत. अगदी हुबेहूब डान्स स्टेप करत या महिलांनी सगळ्यांचं मन जिंकलंय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप कळू शकले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @samartha_tours4140 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल 175k व्ह्यूज आले आहेत. तसंच सहलीला जायचं फक्त समर्थ टूर्स सोबत, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आलेली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
आजींच्या डान्सचा हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “आजी रॉक”, तर दुसऱ्याने “कौतुक करावे तेवढे थोडेच आहे आयोजकांचे संपूर्ण नियोजन बेस्ट” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “आजी ऑन फायर ” तर एकाने “आजी आफ्टर बचत गटचे पैसे मिळाल्यावर” अशी कमेंट केली.
