scorecardresearch

‘काला चष्मा’ या हिट गाण्यावर आफ्रिकन मुलांनी केला डान्स, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही त्यांचे फॅन व्हाल!

आम्ही खात्रीने सांगू शकतो की या आफ्रिकन मुलांसारखा उत्तम डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल.

‘काला चष्मा’ या हिट गाण्यावर आफ्रिकन मुलांनी केला डान्स, VIRAL VIDEO पाहून तुम्हीही त्यांचे फॅन व्हाल!
(Photo: Twitter/ Chopsyturvey)

African Kids Dance Viral Video: भारतीय चित्रपटांची गाणी केवळ भारतातच नाही, तर जगातील अनेक देशांमध्ये पाहायला मिळतात. देश-विदेशातील लोक अनेक चित्रपटांच्या हिट गाण्यांवर नाचताना दिसतात. विशेषत: अधिकाधिक लोक सोशल मीडियावर सामील होऊ लागले आहेत, तेव्हापासून लोक गाण्यांवर परफॉर्म करून व्हिडीओ शेअर करू लागले आहेत. सोशल मीडियावर लोकांचे डान्स करतानाचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील, पण आम्ही खात्रीने सांगू शकतो की या आफ्रिकन मुलांसारखा उत्तम डान्स तुम्ही कधीच पाहिला नसेल. होय, सोशल मीडियावर आफ्रिकन मुलांचा डान्स करतानाचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये आफ्रिकन मुले ‘काला चष्मा’ या हिट गाण्यावर थिरकत आहेत. यावेळी मुलं हटके स्टाईलमध्ये डान्स करताना दिसत आहेत. मुलांचे डान्स मूव्ह आणि त्यांचे टॅलेंट पाहून सारेच जण त्यांचे फॅन झाले आहेत. भारतीय वायुसेनेचे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून, त्याला चांगलीच पसंती मिळत आहे. या व्हिडीओमध्ये सुमारे ११ ते १२ मुले दिसत आहेत. ही लहान मुलं गाण्याच्या मूळ स्टेप्स बरोबरच त्यांच्या स्वतःच्या काही स्टेप्स जोडत भन्नाट डान्स सादर केलाय. डान्स मूव्ह्ससोबतच त्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स पाहून लोक आणखीनच त्यांच्या प्रेमात पडू लागले आहेत.

आणखी वाचा : शाहरुख खानचा दिव्यांग फॅनसोबत ‘Chhaiya Chhaiya’ गाण्यावर डान्स; VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नाशिक हादरलं….मैत्रीला नकार दिला म्हणून दिवसाढवळ्या पेट्रोल पंच कर्मचारी महिलेवर केला चाकूने वार, घटनेचा VIDEO VIRAL

हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक पुढे तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यावाचून स्वतःला आवरू शकत नाहीत. लोक त्या लहान मुलांच्या टॅलेंटचं कौतूक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.७ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७८ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. परदेशात भारतीय गाणी लोकांना कितपत आवडतात याचा आनंद आहे, तर दुसरीकडे वर्णभेदासारखे मुद्दे उपस्थित करून लोक वाद घालत आहेत. तर अनेक लोक इथेही बॉलिवूड विरुद्ध दक्षिण चित्रपटांचे युद्ध सुरू करताना दिसतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.