scorecardresearch

साथीदारासोबत मस्ती करताना धाडकन पडलं हत्तीचं पिल्लू, हा गोंडस VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ दोन हत्तींच्या पिल्लांचा आहे. या व्हिडीओमध्ये हत्तींची ही दोन पिल्ले एकमेकांसोबत खेळत असून एकमेकांशी भांडत आहेत. हा व्हिडीओ शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्टने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

baby-elephant-tumbling
(Photo: Instagram/ sheldricktrust )

प्राण्यांच्या पिल्लांचे व्हिडीओ बघायला खूप मजेदार असतात. प्राण्यांची पिल्ले खेळताना, भांडताना, खोडकरपणा करताना अतिशय गोंडस दिसतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे, जो दोन हत्तींच्या पिल्लांचा आहे. या व्हिडीओमध्ये हत्तींची ही दोन पिल्ले एकमेकांसोबत खेळत असून एकमेकांशी भांडत आहेत. हा व्हिडीओ शेल्ड्रिक वाइल्डलाइफ ट्रस्टने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये हत्तीचे पिल्लू दुसऱ्या साथीदारासोबत भांडण करण्याचा प्रयत्न करत आहे. मस्तीच्या नादात यातला एक हत्तीचं पिल्लू अडखळतं आणि धापकन खाली पडतं, तेव्हाचे दृश्य पाहणं फारच मजेदार आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या तोंडून एकवेळ अरेरे निघेल पण चेहऱ्यावर हसू आल्याशिवाय राहणार नाही.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की हत्तीचे पिल्लू नोआ दुसर्‍या लहान पिल्लू योगीला भांडणासाठी चिडवत होता, परंतु त्याला माहित नव्हतं की, त्यांचं हे भांडण इतक्या मजेदार पद्धतीने संपेल म्हणून. कॅप्शनमध्ये असंही लिहिलं आहे की, नोआने आपला विजय साजरा करण्याची तसदी घेतली नाही आणि घाईघाईने सुरक्षेसाठी आईला गाठले. ही संस्था हत्ती किंवा इतर प्राण्यांची काळजी घेते, असं देखील या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे. ही संस्था हत्तींचं संरक्षण करते आणि त्यांना जंगलात राहण्यासाठी व्यवस्था करते.

आणखी वाचा : Viral Video : पाणी पिण्यासाठी आलेल्या जग्वारला दिसला अजगर, पुढे जे झालं ते पाहून हैराण व्हाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बाप रे बाप! गवतासारखा साप? VIRAL VIDEO पाहून सर्वजण हैराण

नोआ आणि योगी हे हत्ती कुटुंबातील दोन नवीन सदस्य आहेत. त्याची आई नसलोट आणि यट्टा हे अनाथ आहेत. या संस्थेने त्यांना वाचवले, वाढवले ​​आणि जंगलात परत आणले. हत्तींची ही पिल्ले जन्माने भाऊ नसली तरी आता ते केनियातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान त्सावो येथे एकत्र वाढतील. त्यांनी असेही लिहिले की, आमची फील्ड टीम नेहमी पडद्यामागे काम करत राहतील.

या व्हिडीओला ३२ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर अनेक कमेंट्सही आल्या आहेत. लोकांनी लिहिले की, ते त्याच्यावर खूप प्रेम करत आहेत. लोक म्हणतात की, अशा व्हिडीओंमुळे त्यांना आनंद होतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral video of baby elephant tumbling while engaged in duel with another baby elephant prp