Beggar Purchases iPhone 16 Pro Max Video Goes Viral : अनेकदा खूप मेहनत केली की तुम्ही श्रीमंत व्हाल, तुम्हाला आयुष्यात यश मिळेल असं सांगितलं जातं. पण या विचाराला छेद देणारे उदाहरण नुकतेच उजेडात आले आहे. राजस्थान येथील अजमेर शरीफ येथील एका भिकार्‍याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भिकाऱ्याने अनेकांना प्रचंड मेहनत करूनही शक्य होत नाही असं काम करून दाखवलं आहे. त्याने भीक मागून जमवलेल्या पैशांनी आयफोन १६ प्रो मॅक्स हा स्मार्टफोन विकत घेतला आहे. दरम्यान हा व्हिडीओ समोर आल्यानंतर समाज माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

शेख नावाच्या व्यक्तीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ पाहून लोकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेक जण त्यांनी निवडलेल्या करियरवरही संभ्रम व्यक्त करत आहेत.

Mobile phone tariff declined 94 pc since 2014 says Jyotiraditya
मोबाईल फोन सेवांचे दर देशात सर्वाधिक कमी; इतकी स्वस्त झाली सेवा
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Egg Theft In America
अमेरिकेतील दुकानातून एक लाख अंडी चोरीला गेली, कारण काय?
pune crime latest news in marathi
पुणे: ग्राहकाकडून भाजी विक्रेत्यावर चाकूने वार, खडकी भाजी मंडईतील घटना
anjali damania on dhananjay Munde
Dhananjay Munde : अंजली दमानियांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडे आक्रमक, एक्स पोस्टद्वारे इशारा; म्हणाले, “मोघम आरोप करणाऱ्या…”
Flight Rule Of Handbags Indigo Scales Questioned By Passenger After Same Bag Weighs 2 Kg Differently video
“पैसे उकळण्यासाठी काहीही” विमानतळावर होतेय प्रवाशांच्या बॅगांची फसवणूक? VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Global stock markets crash following a controversial decision by Donald Trump.
Global Share Market Crash : डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाचा जगभरातील गुंतवणूकदारांना फटका, आयात शुल्क वाढीमुळे जागतिक शेअर बाजार कोसळले
Viral Video
Viral Video : “प्रत्येक गुजराती एलॉन मस्क आहे”, कॅनडामध्ये वीज बचतीचा ‘देसी जुगाड’ पाहून नेटकरी हैराण

या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, अपंग असलेला शेख सांगतो आहे की, त्याने मोबाइल विकत घेण्यासाठी ॲपल स्टोअरमध्ये १.७० लाख रुपये रोख दिले. व्हिडीओमध्ये आयफोन विकत घेण्यासाठी पैसे कुठून आले? असा प्रश्न मुलाखत घेणारा व्यक्ती भिकार्‍याला विचारतो, यावर तो हसत हसत “भीक मागून” असं उत्तर देतो.

या व्हिडीवर लोक भरभरून कमेंट्स करत आहेत. अनेक जण शिक्षणासाठी मोटा पैसा खर्च करतात, चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक अशा सर्वच गोष्टींची काळजी घेतली जाते. पण शेख भीक मागून आयफोन विकत घेतला याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. एका वापरकर्त्याने या व्हिडीओवर कमेंट करत लिहिले की, “सर्वोत्तम उद्योग आहे, कसलीही गुंतवणूक नाही, कोणाची नोकरी करण्याची आवश्यकता नाही, मेहनत नाही, ताण नाही, कोणावरही अवलंबून राहावं लागत नाही, मजाच मजा”.

तर दुसऱ्या एका वापरकर्ताने सामान्य मध्यमवर्गीय लोकांपेक्षा भिकाऱ्यांची स्थिती चांगली आहे. तर आणखी एका वापरकर्त्याने त्यांना (भीक मागणाऱ्यांना) खायला द्या पैसे देऊ नका असे म्हटले आहे.

Story img Loader