सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक तरुण मुलगा खांद्यावर बॅग लटकवून रस्त्यावरून पळताना दिसतोय. पळता पळता मागून एक कारवाला येतोय आणि त्याच्याशी गप्पा मारतोय, त्याला घरी सोडण्याची इच्छा दर्शवतोय. तुमच्या पर्यंतही हा व्हिडीओ आला असेलच. काय आहे हा व्हिडीओ? जाणून घ्या.


विनोद कापरी यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये ते एकाला लिफ्ट देण्यासाठी ऑफर करतात. रात्री बारा वाजताच्या सुमारास नोएडा रस्त्यावर एक मुलगा त्यांना पाठीवर बॅग घेऊन धावत सुटल्याचं दिसतं.काहीतरी अडचण असेल म्हणून विनोद कापरी त्याला लिफ्ट ऑफर करतात. तो मुलगा लिफ्ट नाकारतो म्हणून ते त्याला सारखी विनवणी करतात. पण हा मुलगा आपल्या धावत जाण्यावरच ठाम असतो. गाडीत बसायला तो नकारच देत राहतो. गाडीत बसायला नकार देणाऱ्या या मुलाशी तसाच पुढे संवाद सुरु राहतो.

PM Narendra Modi Singing Kisi Ke Muskarahto Me
“यारो हम अमिर है”, म्हणत नरेंद्र मोदींनी गायलं गाणं? इतर AI Videos पेक्षा ही क्लिप व्हायरल होण्याचं कारण असं की..
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Dog Shot By Police Officer Over 30 Times
धक्कादायक! पोलीस अधिकाऱ्याने कुत्र्यावर झाडल्या ३० पेक्षा जास्त गोळ्या, तरीही वाचला त्याचा जीव; काय आहे प्रकरण?

पाठीवर बॅग घेऊन रात्री रस्त्यानं धावत जाणाऱ्या ‘त्या’ मुलाचा व्हिडीओ पाहून भारावले आनंद महिंद्रा; म्हणाले…


या व्हिडीओमध्ये रस्त्यावर धावणाऱ्या मुलाचं नाव आहे प्रदीप मेहरा. प्रदीप दहा किलोमीटर धावत सुटलाय. रात्रीचे बारा वाजलेत. दहा किलोमीटर धावून तो घरी जाणार. त्यानंतर जेवण बनवणार आणि मग तो ते खाणार.

प्रदीपचं वय आहे १९ वर्ष. आपल्या मोठ्या भावासोबत तो राहतोय. त्याची आई हॉस्पिटलमध्ये आहे. तिच्यावर उपचार सुरु आहेत. दररोज प्रदीप दहा किलोमीटर धावत घरी जातो. पुढे जाऊन त्याला आर्मीमध्ये भर्ती व्हायचंय. त्यासाठी त्यानं धावण्याचा सराव सुरु ठेवलाय. घरी जाऊन जेवण करणार कधी, तो ते खाणार कधी म्हणून त्याला जेवणाचीही ऑफर देतात. पण जर मी तुमच्याबरोबर जेवलो तर माझा मोठा भाऊ काय खाईल, असा प्रतिप्रश्न प्रदीप करतो.

लिफ्ट नाकारणाऱ्या या मुलाचा व्हिडीओ व्हायरल करण्याबाबतही विनोद कापरी त्याला विचारतात. तेव्हा मी काहीच चुकीचं करत नाहीये, असं म्हणत तो आपल्या भूमिकेवर ठाम राहतो. पण गाडीत बसत नाही. नेमका हा सगळा संवाद काय होतो, ते समजून घेण्यासाठी एकदा हा व्हिडीओ पाहावाच लागेल…


हा व्हिडीओ शेअर करताना आपल्या ट्वीटमध्ये विनोद कापरी म्हणतात, “हे खरं सोनं आहे. नोएडाच्या रस्त्यावर काल रात्री बारा वाजता मला हा मुलगा खांद्यावर बॅग घेऊन वेगाने पळताना दिसला. मी विचार केला की काही समस्या असेल, आपण त्याला लिफ्ट देऊ. पण या मुलाने वारंवार लिफ्ट घ्यायला नकार दिला. कारण ऐकलंत तर या पोराच्या प्रेमात पडाल”.