तरुणींना इम्प्रेस करण्यासाठी तरुण काय काय नाही करत. तरुणी शक्यतो श्रीमंत तरुणांकडे आकर्षित होतात, असं मुलांना वाटत असतं. त्यामुळे तरुण आपली श्रीमंती दाखवण्याची एकही संधी सोडत नाही. असाच प्रयत्न या मुलांनी केला. मुलीला पाहून या तरूणांनी आपल्या श्रीमंतीचा थाट जरूर दाखवण्याचा प्रयत्न केला, पण केवळ एका नाण्यानं या तरूणांच्या खोट्या श्रीमंतीचा भांडाफोड केला. हा व्हिडीओ फारच मजेदार आहे. केवळ एका नाण्याने या तरूणांचा भांडाफोड केल्यानंतर जे दृश्य दिसून येतं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल. हा व्हिडीओ एकदा पाहिल्यानंतर तो वारंवार पाहण्याचा मोह आवरता येत नाही.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चार मुले एका रेस्तरॉंमध्ये बसलेले दिसून येत आहेत. रेस्तरॉंमध्ये बसल्या बसल्या ते आपापसात गप्पा मारण्यात व्यस्त असलेले दिसून येत आहे. त्यांच्या शेजारीच एक मुलगीही बसलेली दिसून येत आहे. चार तरूण एकमेकांसमोर गप्पा मारत असताना त्यांची नरज शेजारी बसलेल्या मुलीकडे जाते. मुलीला पाहून त्यातला एक जण अचानक श्रीमंतीच्या गप्पा सुरू करतो. इतर तीन जणांना तो मुलीकडे खुणावत मुलीला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात हे तरूण आपआपली श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करत असतात.
कोणी म्हणतं की माझ्याकडे एक आलिशान अपार्टमेंट आहे, कोणी म्हणतं की माझ्याकडे महागड्या कार आहेत. मुलांचे हे सारं बोलणं शेजारी बसलेली मुलगी ऐकत असते. या मुलांच्या बोलण्यात मुलीने इंटरेस्ट दाखवायला सुरूवात करणार तितक्यात बाजुला कुणाचं तरी एक नाणं पडलेलं दिसतं. नाणं जमिनीवर पडल्यावरही मुलं बोलत असतात. त्यानंतर नाणं मिळवण्यासाठी हे सर्वजण आपापसात भांडतात. अक्षरशः जमिनीवर लोळेपर्यंत हे चारही तरूण नाणं मिळवण्यासाठी एकमेकांसोबत झटापटी करू लागतात. हे दृश्य फारच मजेदार आहे.
आणखी वाचा : ‘Kacha Badam’ गाण्याची क्रेझ थेट टांझानियापर्यंत पोहोचली…, ‘त्या’ तरूणाचा डान्स होतोय VIRAL
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : सापाचे लागोपाठ वार आणि उंदराची अगदी ‘ब्रूस ली’ सारखी फाईट, पाहा कोणी मारली बाजी…
हा व्हिडीओ unchoandfocusedindian नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून हे स्पष्टपणे समजू शकतं की हा केवळ मनोरंजनासाठी बनवला गेलेला व्हिडीओ आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये असं लिहिलंय की, “किती तुम्ही फुशारक्या मारा, पण तुमची मुळे कधीच विसरता येणार नाहीत.” हा व्हिडीओ शेअर करून अवघे सहाच तास उलटले आहेत तर हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की, आतापर्यंत या व्हिडीओला १.३ मिलियनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख ८३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.
लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहे. हा मजेदार व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स शेअर करण्यास मात्र विसरत नाहीत. एका यूजरने या व्हिडीओवर लिहिलं आहे की, ‘ही आमच्या मित्रांची कहाणी आहे.’ हा व्हिडीओ जितका मजेदार आहेत, त्याहूनही मजेदार यावरील कमेंट्स आहेत.