scorecardresearch

Video: करोनापासून वाचण्यासाठी या जोडप्याने केलेला भन्नाट जुगाड एकदा पाहाच

करोनापासून वाचण्यासाठी जोडप्याचा भन्नाट जुगाड (फोटो: सोशल मीडिया)

Video: करोनापासून वाचण्यासाठी या जोडप्याने केलेला भन्नाट जुगाड एकदा पाहाच
करोनापासून वाचण्यासाठी जोडप्याचा भन्नाट जुगाड (फोटो: सोशल मीडिया)

चीनमध्ये करोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्येत भर पडत असल्याने प्रत्येकजण करोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेत असल्याचे दिसत आहे. दरम्यान तेथील एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये या जोडप्याने करोनापासून वाचण्यासाठी एक जुगाड केल्याचे दिसत आहे.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक जोडपं प्लास्टिकच्या मोठ्या फुग्यासारख्या आवरणामध्ये उभे असलेले दिसत आहेत. करोनापासून वाचण्यासाठी या जोडप्याने हा भन्नाट जुगाड केला आहे. त्यांनी छत्री प्रमाणे या प्लास्टिकच्या या आवरणाला अशाप्रकारे तयार केले आहे की त्याने पुर्ण शरीराचे संरक्षण केले जाते, तसेच ते घेऊन सहज फिरता देखील येते. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.

आणखी वाचा: दफनभूमीबाहेर लांबच लांब रांगा, नातेवाईकांना तासनतास बघावी लागतेय वाट; चीनमधील करोना प्रादुर्भावाची दाहकता दाखवणारा Video

व्हायरल व्हिडीओ:

आणखी वाचा – Photos: चीन सरकार म्हणतं, ‘आठच करोना मृत्यू’ पण एकाच दिवसात मृत्यूपत्रासाठी ११ लाख अर्ज; नव्या दफनभूमींच्या संख्येनंही गूढ वाढलं

हा भन्नाट जुगाड नेटकऱ्यांनाही आवडला असून, या कल्पनेचे त्यांनी कौतुक केले आहे. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 11:02 IST

संबंधित बातम्या