Viral Video of couple kissing on car's sunroof: सोशल मीडियावर रील्स व्हायरल होण्याचं प्रमाण वाढत चाललंय. अनेक मजेशीर, गंभीर, अश्लील व्हिडीओ आजकाल सहज व्हायरल होतात. कळत-नकळतपणे अनेक लोक सार्वजनिक ठिकाणी अश्लील चाळे करतात आणि मग त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात अनेकदा सार्वजनिक ठिकाणी कपल्स रोमान्स आणि अश्लील कृत्य करतानाचेही व्हिडीओ असतात. आता असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. नक्की घडलं तरी काय? जाणून घेऊया. व्हायरल व्हिडीओ (Viral Video of couple kissing on car's sunroof) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर)वर एक व्हिडीओ तुफान (Viral Video of couple kissing on car's sunroof) व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये घडलेली घटना लखनऊमधील आहे. या व्हिडीओत एक जोडपं चालत्या कारच्या सनरूफवर एकमेकांना किस करताना दिसतंय. त्याचबरोबर त्यांचे अश्लील चाळेदेखील सुरूच आहेत. हा व्हिडीओ 'Anujjournalist9889' या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, "लखनऊ : संस्कृती आणि शिष्टाचाराचे शहर गोमतीनगरसारखा भाग आता बदनाम होतोय. दंगलीनंतर प्रेमी युगुलांची अश्लीलता चव्हाट्यावर आली; १०९० चौक ते मुख्यमंत्री चौकापर्यंत हे कपल बिनधास्तपणे हे अश्लील कृत्य करीत राहिले. त्या वेळेस पोलिस गैरहजर होते. हे कृत्य UP 78 GB 0130 क्रमांकाच्या कारच्या सनरूफवर घडत होतं", असं कॅप्शन या व्हिडीओला (Viral Video of couple kissing on car's sunroof) देण्यात आलं आहे. हेही वाचा. विद्येच्या मंदिरात विद्यार्थ्यांचे अश्लील चाळे; विद्यापीठात दोघांनी केलं किस अन्…, VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त या प्रकरणावर आता लखनऊ पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि आश्वासन दिले आहे की, तपास केला जात आहे आणि या प्रकरणाच्या संदर्भात आवश्यक पावले उचलली जातील. युजर्सच्या प्रतिक्रिया व्हिडीओ व्हायरल (Viral Video of couple kissing on car's sunroof) होताच अनेकांनी या कृतीचा निषेध केला आहे; तर काही जण या कृतीला समर्थन देतानादेखील दिसत आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “यामध्ये काहीही चुकीचं नाही. तुम्ही तुमची मानसिकता बदला.” तर एकानं कमेंट करीत लिहिलं की, अश्लील ते नाही आहेत; तर ज्यानं हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे, तो आहे. स्वत: जगा आणि दुसऱ्यांना जगू द्या. देशात अनेक मोठ्या समस्या आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करा आणि हा सगळा टाईमपास बंद करा. हेही वाचा. माणुसकीचा अंत! दुचाकीस्वाराच्या चाकाखाली चिरडलं श्वानाचं पिल्लू; धक्कादायक VIDEO पाहून चुकेल काळजाचा ठोका दरम्यान, याआधी ऑक्टोबर २०२३ मध्ये हैदराबादमध्येदेखील अशीच एक घटना उघडकीस आली होती, जिथे एक तरुण जोडपं सनरूफवर किस करीत होतं.