Viral Video: सोशल मीडियावर रोज असे व्हिडिओ व्हायरल होत असतात, जे लोकांना आश्चर्यचकित करतात आणि भावूकही करतात. अलीकडेच असा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्या काळजाचा ठोकाच चुकेल. असं नेमकं काय आहे त्या व्हिडीओमध्ये, जाणून घेऊ या…

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असं दिसतं की, एक लहान मुलगी रेल्वे ट्रॅकजवळ उभी होती आणि त्याच वेळी भरवेगात ट्रेन येत होती. परिस्थिती खूप धोकादायक होती आणि कधीही मोठा अपघात होऊ शकत होता. पण तेवढ्यात काहीतरी असं घडलं, ज्याला लोक चमत्कार म्हणत आहेत. तसंच हा व्हिडिओ आता इंटरनेटवर खूप चर्चेत आहे. नेमकं असं घडलं तरी काय ते जाणून घेऊ या…

चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावरील या व्हायरल व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ उभी असलेली दिसते. थोड्याच अंतरावरून वेगाने ट्रेन येताना दिसते. वातावरण खूप तणावपूर्ण होतं कारण मुलगी धोक्यात असल्यासारखं वाटू लागतं. जशी ट्रेन जवळ येते, त्याच क्षणी एक गाय अचानक वेगाने मुलीकडे धावते.

व्हिडिओमध्ये गाय मुलीला ढकलून ट्रॅकपासून दूर घेऊन जाते असं दिसतंय आणि त्यामुळे तिचा जीव वाचतो. ही घटना जितकी जास्त धक्का देणारी आहे तितकीच दिलासादायकदेखील आहे.

सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडीओ@PariIshq या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘जेव्हा माणस गप्प राहिली, तेव्हा एका प्राण्याने माणुसकी दाखवली.’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप कळू शकलेले नाही.

सोशल मीडियावर लोकांच्या प्रतिक्रिया

हा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर आल्या. अनेक युजर्सनी याला चमत्कारिक बचाव म्हटलं. काही लोकांनी गायीच्या या कृतीचं खूप कौतुक केलं. तर काहींनी रेल्वे ट्रॅकजवळील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांचं म्हणणं आहे की मुलांना अशा धोकादायक ठिकाणांपासून दूर ठेवणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून कोणताही अपघात टाळता येईल. मात्र काही लोक हा व्हिडिओ एआयने बनवलेला आहे असंही म्हटलं आहे.